-
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून हिवाळी अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली.
-
मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर उरलेले आमदार निघून जातील यामुळे घाबरून जाऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
-
यावर एकनाथ शिंदेंनीही अजित पवारांना आपण एकत्र मिळून हे मंत्री ठरवू असा टोला लगावला.
-
अजित पवार गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
देवेंद्र फडणवीस अडचणीच्या विषयांवर बोलले नाही – अजित पवार
-
कुठं कसं काय बोलावं आणि कुठलं बोलू नये, कशाला बरोबर दुर्लक्षित करावं हे फडणवीसांना चांगलं जमतं – अजित पवार
-
मी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा विषय काढला. त्या विषयाला तर फडणवीसांनी स्पर्शच केला नाही – अजित पवार
-
त्यावेळी त्यांनी सुनेत्राताईंचं नाव घेतलं, पण ते वेगळ्या अर्थाने नाव घेतलं. मात्र, मला तसलं काही सांगू नका – अजित पवार
-
तिथं आमच्या मंदाताई, मनिषाताई अशा मान्यवर महिला लक्ष ठेऊन आहेत – अजित पवार
-
मी गंमतीने म्हणतो असं नाही. ज्यावेळी आपण राज्याला पुढे घेऊन जात असतो तेव्हा महिलांनाही प्रतिनिधित्व द्या – अजित पवार
-
मंत्रिमंडळातील बाकीच्या रिक्त जागाही भरा. कोणाला घ्यायचं त्यांना घ्या – अजित पवार
-
मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका – अजित पवार
-
मंत्रिमंडळातील ४३ जागा भरल्यावर उरलेले आमदार निघून जातील का याची तुम्ही अजिबात काळजी करू नका – अजित पवार
-
आपण दोघे धरून २० च मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणखी २३ मंत्री करण्याचा अधिकार आहे – अजित पवार
-
यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण मिळून २३ मंत्री ठरवू. त्यानंतर अजित पवारांनी हसत प्रतिक्रिया दिली.
-
मला मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयात सहभागी करून घेऊ नका – अजित पवार
-
उगीच सुई दुसरीकडे कुठेतरी सोडतात आणि मग वेगळी चर्चा होते – अजित पवार
-
तुमचं तुम्हीच ठरवा. ते भरत गोगावले सारखे माझ्याकडे बघून मिशा पिळतात, दाढीवरून हात फिरवतात. काय न सांगितलेलं बरं – अजित पवार
-
आज सत्ताधारी पक्षातले दोन आणि विरोधकांचा एक असे तीन प्रस्ताव होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांनी मिळून त्याचं उत्तर दिलं – अजित पवार
-
मी बघत होतो. उपमुख्यमंत्री प्रत्येकवेळी आक्रमकपणे मुद्दा मांडतात. टाळ्या घेतात. सगळे बाकडी वाजवत असतात – अजित पवार
-
देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे. मी बघितलंय – अजित पवार
-
जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते, तेव्हा एकही भाजपावाला टाळी वाजवत नव्हता – अजित पवार
-
तुम्ही टीव्हीवर बघा. तानाजीराव गेले, तेव्हा तर त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं की टाळ्या वाजवा – अजित पवार
-
देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्षं मुख्यमंत्री होतात.एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? – अजित पवार
-
तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होतो. तुम्ही इतके अस्वस्थ होत होता – अजित पवार
-
माझं तुमच्याकडेच लक्ष होतं. कारण सगळ्यात जवळ इथून तुम्हीच आहात. बाकीचे सगळे लांब आहेत – अजित पवार
-
दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी “आम्हालाही चान्स मिळणार आहे”, असं म्हणताच “तुम्हाला तर सगळा चान्स आहेच. तुम्ही विधिमंडळाचे नेतेच आहात”, असं अजित पवारांनी सांगितलं.
Photos : “आपण मिळून २३ मंत्री ठरवू”, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्यात…”
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून हिवाळी अधिवेशनात जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
Web Title: Important statements of ajit pawar on eknath shinde devendra fadnavis in assembly session pbs