-

हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस शुक्रवारी ( ३० नोव्हेंबर ) चांगलाच गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
-
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली. तर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टोले लगावले.
-
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील फुटीचं कारण सांगत उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला. यावरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले.
-
“आम्हाला सर्वांना फुटीचं कारण माहिती आहे. आम्हाला त्याच काही देणंघेणं नाही,” असं प्रत्युत्तर अजित पवारांनी शिंदेंना दिलं.
-
“शरद पवारांनी १९७८ साली पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. हशु अडवाणी, उत्तमराव पाटील तेव्हा मंत्रिमंडळात होते.”
-
“त्यावेळी कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नव्हती. एखादं दुसरा चिमटा काढला, तर आम्ही समजू शकतो,” असं अजित पवारांनी म्हटलं.
-
“बाहेर ज्यांना सोडून आला, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार, ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि इथे सांगणार, याचं आम्हाला काय देणंघेणं,” असेही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
-
“आपला महाराष्ट्र आहे, शाहू-फुले-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजाचं आपण नाव घेतो.”
-
“यशवंतराव चव्हाणांची शिकवण काय बघा, आचार्य अत्रे किती टीका करायचे माहीत आहे, या टीकेला यशवंतराव चव्हाण दिलदारपणे घ्यायचे,” असंही अजित पवार म्हणाले.
-
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही याच्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालं आहे. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झाला आहात.”
-
“असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही.”
-
“मला काम कसं मिळेल, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार, याकडे त्यांचं लक्ष आहे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.
“आम्हाला त्याच्याशी काय देणंघेणं”, उद्धव ठाकरेंवरील टोमण्यांवरून अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना खडेबोल; म्हणाले…
“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही याच्यातून बाहेर या. तुम्हाला…”, असेही अजित पवारांनी म्हटलं.
Web Title: Ajit pawar attacks eknath shinde over uddhav thackeray taunt ssa