• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chitra wagh criticize urfi javed for her photos and videos on instagram social media pbs

Photos : “एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते आणि हा नंगानाच…”, उर्फीच्या पोस्टवर चित्रा वाघ आक्रमक

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवर सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशात चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद करत उर्फी जावेदविरोधात हल्लाबोल केला.

Updated: January 10, 2023 09:10 IST
Follow Us
  • भाजपा नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.
    1/24

    भाजपा नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.

  • 2/24

    चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवर सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे.

  • 3/24

    अशात चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद करत उर्फी जावेदविरोधात हल्लाबोल केला.

  • 4/24

    यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाला आणि आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य केलं.

  • 5/24

    चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्यात याचा हा आढावा…

  • 6/24

    अत्याचाराचा बळी ठरलेल्या एका नऊ वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने मला एक व्हिडीओ पाठवला – चित्रा वाघ

  • 7/24

    त्या व्हिडीओत उर्फी जावेद अंगावर नगण्य कपडे घालून भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचं ओंगळवाणं, किळसवाणं प्रदर्शन करत फिरताना दिसली – चित्रा वाघ

  • 8/24

    त्यांनी मला आणखीही काही इंस्टाग्राम लिंक्स पाठवल्या. त्या तर मी बघूच शकले नाही – चित्रा वाघ

  • 9/24

    व्हिडीओ पाठवणाऱ्या महिलेला मी फोन केला. तिने सांगितलं दीड वर्षांपूर्वी तिची नऊ वर्षांची मुलगी अत्यंत घाणेरड्या विकृतीला बळी पडली – चित्रा वाघ

  • 10/24

    या विषयावर कोणी बोलणार आहे की नाही असा प्रश्न त्या पीडित मुलीच्या आईने विचारला – चित्रा वाघ

  • 11/24

    त्या महिलेशी बोलले म्हणून मी ही कोण उर्फी आहे आणि तिचा काय नंगानाच आहे हे मी त्या दिवशी पाहिलं – चित्रा वाघ

  • 12/24

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही – चित्रा वाघ

  • 13/24

    यात बऱ्याच उड्या पडल्या. या सर्व अपेक्षित उड्या होत्या – चित्रा वाघ

  • 14/24

    इथं विषय धर्माचा नाही. इथं विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या विकृतीचा आहे – चित्रा वाघ

  • 15/24

    आमचा विरोध त्या उर्फीला नाही, त्या महिलेला नाही, तर तिच्या नंगानाच करणाऱ्या विकृतीला आहे – चित्रा वाघ

  • 16/24

    हा आमचा विरोध चालूच असणार आहे आणि आम्ही हा विषय शेवटापर्यंत नेऊ – चित्रा वाघ

  • 17/24

    कोणी काय कपडे घालवे आणि कोणी काय कपडे घालू नये यावर काय बोलायचं असं काहीजण म्हणत आहेत. मात्र, आधी कपडे तर घाला – चित्रा वाघ

  • 18/24

    आधी कपडे घाला, मग ठरवू कोणी काय घालयचं आणि कोणी काय घालयचं नाही – चित्रा वाघ

  • 19/24

    जिथं समाजस्वास्थ्याचा विषय आहे तिथं राजकारण करायचं नसतं – चित्रा वाघ

  • 20/24

    या राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगानाच सुरू आहे – चित्रा वाघ

  • 21/24

    ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचं उत्तर त्या उर्फीला समर्थन देणाऱ्यांनी द्यावं – चित्रा वाघ

  • 22/24

    अहो, लेकीबाळी प्रत्येकाच्या घरात आहेत. त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवला जाणार आहे – चित्रा वाघ

  • 23/24

    व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली होणाऱ्या हा स्वैराचार मान्य असणारा मला एक तरी पालक दाखवा – चित्रा वाघ

  • 24/24

    ही आपली संस्कृती नाही. म्हणून आम्ही हा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही – चित्रा वाघ (सर्व फोटो सौजन्य – उर्फी जावेद इंस्टाग्राम, चित्रा वाघ सोशल मीडिया आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
उर्फी जावेदUrfi Javedचित्रा वाघChitra Waghभारतीय जनता पार्टीBJPमनोरंजनEntertainmentरुपाली चाकणकरRupali Chakankar

Web Title: Chitra wagh criticize urfi javed for her photos and videos on instagram social media pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.