• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know allegations of narayan rane on sanjay raut about uddhav thackeray rashmi thackeray pbs

Photos : “संजय राऊतांनी मला उद्धव-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगितलं ते मी…”, नारायण राणेंनी नेमके काय गंभीर आरोप केले? वाचा…

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. ते नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

January 7, 2023 18:07 IST
Follow Us
  • narayan-rane (2)
    1/18

    केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले.

  • 2/18

    “संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे,” असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

  • 3/18

    तसेच राऊतांनी मला दिलेली माहिती ऐकली तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील, असा दावाही राणेंनी केला.

  • 4/18

    ते शनिवारी (७ जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

  • 5/18

    एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे – नारायण राणे

  • 6/18

    कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे – नारायण राणे

  • 7/18

    यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे – नारायण राणे

  • 8/18

    तेव्हा संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे – नारायण राणे

  • 9/18

    मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा – नारायण राणे

  • 10/18

    राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे – नारायण राणे

  • 11/18

    हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा – नारायण राणे

  • 12/18

    असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका – नारायण राणे

  • 13/18

    राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे – नारायण राणे

  • 14/18

    अशावेळी माध्यमं संजय राऊतांविषयी बोलत आहेत. मात्र, रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम आहे – नारायण राणे

  • 15/18

    मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत – नारायण राणे

  • 16/18

    मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही – नारायण राणे

  • 17/18

    दरम्यान, नारायण राणेंनी संजय राऊतांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

  • 18/18

    संजय राऊत यांनी राणेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना कधीही भेटलो नसल्याचं म्हटलं. (सर्व फोटो – संग्रहित)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayनारायण राणेNarayan RaneशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Know allegations of narayan rane on sanjay raut about uddhav thackeray rashmi thackeray pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.