Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut taunt eknath shinde and shinde group ssa

“मोदींच्या शिवसेनेनं महाराष्ट्राच्या सीमापार करुन…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक टोला

“देवाची मूर्ती चोरणारे मंदिर उभारत नाही, तर ते…”

January 23, 2023 22:43 IST
Follow Us
  • निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाही. पक्षप्रमुख हे जनतेने बहाल केलं आहे. शिवसेना ही धगधगती संघटना आहे. रक्तातून निर्माण झालेला शिवसेनेचा इतिहास आहे, तो कोणत्याही शाईने मिटवता येणार नाही, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी सांगितलं.
    1/9

    निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाही. पक्षप्रमुख हे जनतेने बहाल केलं आहे. शिवसेना ही धगधगती संघटना आहे. रक्तातून निर्माण झालेला शिवसेनेचा इतिहास आहे, तो कोणत्याही शाईने मिटवता येणार नाही, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी सांगितलं.

  • 2/9

    “शिवसेनेचा इतिहास काय आहे, हे अनुभवायचं असेल तर मोदींची शिवसेना निर्माण झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या सीमापार करुन पाहाव्यात,” असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

  • 3/9

    “हल्ली देवांच्या मूर्तीही चोरायला लागले आहेत. मात्र, देवाची मूर्ती चोरणारे मंदिर उभारत नाही. तर ते विकतात. हे चोर असून, दुर्लक्ष करा. ते आले तसे नष्ट होतील.”

  • 4/9

    “पावसाळ्यात गांडुळ येतात. त्यानंतर त्यांचं अस्तित्व संपते,” असा टोमणा शिंदे गटाला संजय राऊतांना लगावला आहे.

  • 5/9

    “संपूर्ण देशात शिवसेना म्हटलं की आजही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे समोर येतात. जो उत्साह आज दिसतोय हे शिवसेनेचं भविष्य आहे.”

  • 6/9

    “आपल्या तीन चाकी रिक्षाला प्रकाश आंबेडकरांचं चौथं चाक लागलं आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

  • 7/9

    “शिवसेनेने सातत्याने रक्त सांडलं आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही.”

  • 8/9

    “शिवसेनेला संपवण्याचं, मिटवण्याचं नष्ट करण्याचं कारस्थान सुरु आहे. त्या सर्वांना पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही.”

  • 9/9

    “ही शिवसेना ज्या उद्दात्त हेतूनं बाळासाहेबांनी उभी केली. तो पक्ष कोणालाही तोडता येणार नाही,” असेही संजय राऊतांनी बजावलं.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut taunt eknath shinde and shinde group ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.