Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis criticize shivsena over reservation marathwada university renaming after alliance with vba pbs

Photos : “शिवसेनेचा आरक्षणाला-मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध, त्यामुळे आता…”, फडणवीसांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचितच्या या युतीवर सडकून टीका केली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

January 24, 2023 17:38 IST
Follow Us
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचितच्या या युतीवर सडकून टीका केली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा...
    1/18

    शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली.

  • 2/18

    यानंतर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने राजकीय समीकरणं बदलतील असा अंदाज लावला जात आहे.

  • 3/18

    अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचितच्या या युतीवर सडकून टीका केली.

  • 4/18

    फडणवीस मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 5/18

    शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीने फार परिणाम होईल, असं मला वाटत नाही – देवेंद्र फडणवीस

  • 6/18

    याचं कारण म्हणजे ही आघाडी केवळ भाजपाला विरोध म्हणून झाली आहे – देवेंद्र फडणवीस

  • 7/18

    अन्यथा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात खूप अंतर आहे – देवेंद्र फडणवीस

  • 8/18

    मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं तेव्हा भाजपाने त्याला पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता – देवेंद्र फडणवीस

  • 9/18

    मंडल आयोग आला तेव्हा भाजपाने आरक्षणाचं समर्थन केलं, मात्र शिवसेनेने त्याचा विरोध केला होता – देवेंद्र फडणवीस

  • 10/18

    सर्वच प्रकारचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर करावं अशाप्रकारची शिवसेनेची सातत्याने मागणी राहिली आहे – देवेंद्र फडणवीस

  • 11/18

    त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरपीआयची आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याच्याविरोधात शिवसेनेची भूमिका आहे – देवेंद्र फडणवीस

  • 12/18

    अशा नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागतं – देवेंद्र फडणवीस

  • 13/18

    याचा अर्थ भाजपाला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहे. मला वाटतं जनतेला हे समजतं – देवेंद्र फडणवीस

  • 14/18

    प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाही – देवेंद्र फडणवीस

  • 15/18

    आता त्यांना असं वाटतं की शिवसेना बरोबर आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं आपल्याबरोबर येतील – देवेंद्र फडणवीस

  • 16/18

    मात्र, त्यांना माहिती नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली आहे – देवेंद्र फडणवीस

  • 17/18

    हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली, कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं – देवेंद्र फडणवीस

  • 18/18

    त्यामुळे हिंदुत्ववादी मतं शिवसेनेबरोबर कशी राहतील? त्यामुळे या युतीमुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही. त्यांनी युती केली आहे, तर निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो हे बघुयात – देवेंद्र फडणवीस

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisप्रकाश आंबेडकरPrakash Ambedkarभारतीय जनता पार्टीBJPवंचित बहुजन आघाडीVBAशिवसेनाShiv Sena

Web Title: Devendra fadnavis criticize shivsena over reservation marathwada university renaming after alliance with vba pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.