• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis on ajit pawar eknath shinde and ashok chavan ssa

‘प्लॅन A’ अजित पवार, ‘प्लॅन B’ एकनाथ शिंदे, ‘प्लॅन C’ अशोक चव्हाण? फडणवीस म्हणाले…

“कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा, जेलमध्ये टाका असे…”

January 24, 2023 21:38 IST
Follow Us
  • महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पाडेंना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
    1/9

    महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पाडेंना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

  • 2/9

    “मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत.”

  • 3/9

    “मात्र, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा. जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडी सरकारचे होते,” असं देवेंद्र फडणवीसांनी ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

  • 4/9

    ‘प्लॅन अ’ अजित पवार, ‘प्लॅन ब’ एकनाथ शिंदे, ‘प्लॅन क’ अशोक चव्हाण असणार का?, असं विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्यांचे धक्के संपली आहेत.”

  • 5/9

    “आता २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे आश्चर्यांचे धक्के निश्चितपणे देऊ.”

  • 6/9

    “मात्र, आतातरी प्लॅन अ,ब,क काहीच नाही. सध्या आम्हाला चांगलं सरकार चालवायचं आहे.”

  • 7/9

    “महाराष्ट्रात अडीच वर्षात विकास थांबला होता. पण, आता आम्हाला महाराष्ट्र पुन्हा प्रगतिपथावर आणायचा आहे. हेच आमचं ध्येय आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

  • 8/9

    “उद्धव ठाकरेंबरोबर कोणतेही वैर नाही. त्यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही.”

  • 9/9

    “पाच वर्षे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, सरकार चालवतो. किमान फोन करुन तुमच्याबरोबर यायचं नाही, हे सांगायला हवं होतं. पण, तुम्ही ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. याचं मला दु:ख आहे,” अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. ( सर्व छायाचित्र सौजन्य – देवेंद्र फडणवीस फेसबूक )

TOPICS
अजित पवारAjit Pawarअशोक चव्हाणAshok Chavanएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Devendra fadnavis on ajit pawar eknath shinde and ashok chavan ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.