-
काँग्रेस आघाडीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रिपद मिळवता आलं नाही. ही पक्षातील वरिष्ठांची सर्वांत मोठी चूक होती, असं विधान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
-
“तेव्हा आमच्या वरिष्ठांपैकी कोणालाही मुख्यमंत्री केलं असतं, तरी चाललं असतं,” अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते.
-
आतापर्यंत राजकारणात कोणती चूक झाल्याचं वाटलं? यावर अजित पवार म्हणाले, “ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते. ती म्हणजे २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडालया नको होतं. तेव्हा आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचं होतं.”
-
“२००४ साली जर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडं आलं असतं, तर शेवटपर्यंत त्यात बदल होऊ दिला नसता.”
-
“आम्ही तेव्हा ज्युनिअर होतो. मधुकर पिचड, प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील हे वरिष्ठ नेते निर्णय प्रक्रियेत होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं, अशी परिस्थिती होती.”
-
“आपण कितीही काही म्हटलं तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असतं, कुठेतरी नशिबाची साथ लागते.”
-
“देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसे होती आणि आहेत. पण, सगळ्यांचा ते पद मिळतं का?,” असं अजित पवारांनी म्हटलं.
-
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर नेमका काय वाद झाला होता? या प्रश्नावर अजित पवारांनी सांगितलं, “पृथ्वीराज चव्हाण यांना आमदारकीचा आणि मंत्रिमंडळाचा अनुभव नव्हता.”
-
“ते दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयातीला काम पाहात असत. मात्र, दिल्ली आणि राज्यातील राजकारणात खूप अंतर असतं. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असताना दुर्दैवाने काही असं प्रसंग निर्माण झाले, आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले.”
-
“त्याचा फटका बसून नंतर सरकार पडलं,” असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला.
-
२०२४ ला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यावर काय करणार? यावर अजित पवारांनी म्हटलं, “आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं, असं म्हटलासारखं होईल.”
-
“त्यापेक्षा झाल्यावर दाखवितो मी काय करेन ते,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
“…अन् २०१४ साली आमचं सरकार पडलं”, अजित पवारांनी केला गौप्यस्फोट
“२००४ साली जर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडं आलं असतं, तर…”
Web Title: Ajit pawar on prithviraj chavan 2014 congress ncp govt collapse ssa