-
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे आज ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ हे राजकारणासोबतच क्रिकेटचे चाहते होते. ते राष्ट्रपती असताना भारतीय क्रिकेट संघाने २००३-०४ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी पाच वन-डे आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात आली होती.
-
भारतीय क्रिकेट संघ १९९७ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. कारगिल युद्धानंतरची ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट खेळत होते. त्यानंतर पुन्हा एकदा २००५-०६ साली भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी भारतीय संघात महेंद्र सिंह धोनीचा समावेश होता.
-
रांचीतून आलेल्या महेंद्र सिंह धोनीने या पाकिस्तान दौऱ्यात आपल्या फलंदाजींने जगाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी धोनीची फलंदाजी आणि त्याच्या हेअरस्टाईलचे कौतुक राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी देखील केले होते. महेंद्र सिंह धोनी षटकार, चौकार मारल्यानंतर हेल्मेट काढून डोकं हलवत असे. त्यावेळी सोनेरी रंगाने रंगवलेले त्याचे केस अनेक तरुणांना भुरळ पाडत होते. धोनीची स्टाई कॉपी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता.
-
एवढंच नाही तर परवेझ मुशर्रफ यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सौरव गांगुली यांना प्रश्न विचारला की, धोनीला कुठून शोधून आणले. तेव्हा सौरव गांगुलीने मजेशीर उत्तर देत म्हटले की, हा वाघा बॉर्डरजवळ फिरत होतो, तिथूनच त्याला आम्ही उचलले आणि क्रिकेट टीममध्ये घेतले. गांगुली यांनी हा किस्सा अनेक कार्यक्रमात सांगितला आहे.
-
२००६ च्या दौऱ्यात धोनीने लाहोरमध्ये खेळलेल्या एका सामन्यात तुफानी फलंदाजी करत ४६ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे भारताने २८९ धावांचे लक्ष्य गाठून सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात धोनीला सामनावीर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
-
परवेज मुशर्रफ यांनी धोनीचे कौतुक केल्याचा क्षण “धोनी- द अनटोल्ड स्टोरी” या त्याच्या चित्रपटात जसाच्या तसा दाखविण्यात आला आहे. धोनीच्या चेहऱ्याला सुशांत सिंहचा चेहरा दाखवून हा क्षण दाखवला गेला.
-
पाकिस्तानच्या दौऱ्यात धोनीची बॅट चांगलीच तळपली, त्यानंतर धोनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.
-
पण परवेज मुशर्रफ यांचा इतिहास चांगलाच वादग्रस ठरलेला आहे. १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले होते. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते.
-
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते.
-
कारगिल युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००१ मध्ये आग्रा येथे भारत-पाकिस्तानमध्ये शीखर संमेलन घडवून आणले होते. यावेळी परवेज मुशर्रफ यांनी भारताचा दौरा केला होता.
-
परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली दिल्ली येथे झाला होता. १९४७ साली फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थायिक झाले होते. १९७४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. त्यांनी २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.
Photos: धोनीची तळपती बॅट आणि त्याच्या लांब केसांचे चाहते होते परवेज मुशर्रफ
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना २००५-०६ साली भारत-पाकिस्तान दरम्यान पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुशर्रफ यांनी एमएस धोनीच्या केसांचे आणि त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले होते.
Web Title: When parvez musharraf admired ms dhonis long hair asked sourav ganguly about dhoni finding kvg