-
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे.
-
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक वक्तव्ये केली. त्याचा हा आढावा. ते शनिवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.
-
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे – संजय राऊत
-
ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे – संजय राऊत
-
त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही – संजय राऊत
-
राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो – संजय राऊत
-
महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते – संजय राऊत
-
त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते – संजय राऊत
-
ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत – संजय राऊत
-
महाराष्ट्रात मागील मोठा काळ पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार करण्यात आला आहे – संजय राऊत
-
मागील निवडणुकीत बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं हे पुराव्यासह उघड झालं – संजय राऊत
-
पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झालं आहे – संजय राऊत
-
पैसे वाटण्याचं काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होऊ शकतं – संजय राऊत
-
त्यामुळे कसब्याचे महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे – संजय राऊत
-
त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण याआधी भाजपाच्या कालखंडात पोलिसांच्या गाडीतून पैशांची आवक-जावक, वाटप झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत – संजय राऊत
-
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही – संजय राऊत
-
सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे – संजय राऊत
-
हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. निवडणुकीला बेडरपणे सामोरं गेलं पाहिजे – संजय राऊत
-
भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, पैशांचं वाटप करून आमदारांना विकत घेतं, हीच निर्भयता भाजपा निवडणूक घ्यायला का दाखवत नाही? – संजय राऊत
-
आमची इच्छा आहे की, निवडणुका ताबोडतोब घ्याव्यात – संजय राऊत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
“बारामती-पुण्यात पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटप” ते उद्धव ठाकरेंची फडणवीसांना ऑफर, संजय राऊतांची महत्त्वाची विधानं
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक वक्तव्ये केली. त्याचा हा आढावा. ते शनिवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.
Web Title: Important statements of thackeray faction mp sanjay raut in mumbai pbs