शरद पवार की अजित पवार? नाना पाटेकर की नरेंद्र मोदी? MI की CSK? ट्विटर युजर्सच्या भन्नाट प्रश्नांवर रोहित पवारांची अफलातून उत्तरं!
रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर रविवारी #AskRohitPawar हे कॅम्पेन चालवलं. यावेळी ट्विटर युजर्सनं त्यांना भन्नाट प्रश्न विचारले! (सर्व फोटो संग्रहीत)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि ट्विटर युजर्समध्ये रविवारी चांगलाच सवाल जवाब रंगल्याचं पाहायला मिळालं. #AskRohitPawar या हॅशटॅगखाली रोहित पवार यांना ट्विटर युजर्स प्रश्न विचारत होते.
2/31
रविवारी संध्याकाळी रोहित पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नेटिझन्सला प्रश्न विचारण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यावर ट्विटर युजर्सनं एकाहून एक भन्नाट प्रश्न विचारले.
प्रश्न – तुम्ही पक्षात एखाद्या महत्त्वाच्या पदावर काम करून पक्षबांधणी का करत नाही?
रोहित पवार – लवकरच. त्यावेळी आपण युवा म्हणून लवकरच एकत्रित काहीतरी करू.प्रश्न – दौरे, फिरस्तीमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे कधी राजकारण नको रे बाबा असं वाटतं का?
रोहित पवार – माझी मुलं जेव्हा विचारतात की तुम्ही आईच्या सोशल मीडियावर इतर लहान मुलांशी खेळताना दिसता. आम्हाला कधी वेळ देणार? तेव्हा वाटतं की आपण त्यांना वेळ द्यायला हवा.प्रश्न – रोहित पवारांना भाजपामधला कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?
रोहित पवार – नितीन गडकरी साहेबप्रश्न – अदाणी की राहुल गांधी?
रोहित पवार – भारताचे नागरिकप्रश्न – रोहित पवारांना राजकारणाव्यतिरिक्त कुठल्या क्षेत्रात करीअर करायला आवडलं असतं?
रोहित पवार – व्यावसायिक क्षेत्रात मी आहेच.प्रश्न – येत्या काळात राष्ट्रवादीत घराणेशाहीला फाटा देऊन नव्या तरुणांना, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळेल का?
रोहित पवार – मीसुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पक्षाच्या संघटनेला ताकद दिली पाहिजे. कार्यकर्ता नेता होणार असेल, तर त्याला ताकद दिली पाहिजे. हा सकारात्मक बदल आहे, पण त्याला वेळ लागेल.प्रश्न – मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज?
रोहित पवार – टीम म्हणून मुंबई इंडियन्स आणि कर्णधार व खेळाडू म्हणून महेंद्रसिंह धोनीप्रश्न – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बसल्यानंतर शरद पवारांकडून कोणता सल्ला मिळाला?
रोहित पवार – क्रिकेटमध्ये राजकारण आणू नको. व्याप्ती एवडी वाढव की जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देता येईल. निवडक हिरे पुढे आणता येतील. जे केवळ महाराष्ट्राचं नाही, तर देशाचं नेतृत्व करतील.प्रश्न – शरद पवारांनंतर कोणता राजकीय नेता तुम्हाला आवडतो?
रोहित पवार – पंडित जवाहरलाल नेहरूजीप्रश्न – शरद पवार साहेब, अजित दादा की सुप्रिया ताई?
रोहित पवार – शरद पवार साहेब.. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत.प्रश्न – तुमच्याकडे नेटफ्लिक्स आहे का? असेल तर आवडती वेबसिरीज कोणती?
रोहित पवार – हाऊस ऑफ कार्ड्स… कधीकधी डोकं शांत करायला या ओटीटी प्लॅटफॉर्मची मदत घ्यावी लागते.प्रश्न – मटण की चिकन?
रोहित पवार – राशीन (कर्जतचं) मटण.. वजन वाढल्यापासून चिकनवर शिफ्ट झालोय.प्रश्न – अजय अतुलचं कोणतं गाणं आवडतं?
रोहित पवार – देवा श्री गणेशाप्रश्न – माझं एका मुलावर प्रेम आहे. पण आई-वडील लग्नाला तयार नाहीत. आम्ही पळून जायचं ठरवलंय. काय करू?
रोहित पवार – पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल, तर ते म्हणतात तसं नक्की करा!प्रश्न – राज्यातली साखर कारखानदारी, शेतकऱ्यांची थकित बिलं, ऊसतोड महिलांच्या आरोग्याच्या समस्या याकडे तुम्ही कसं बघता?
रोहित पवार – पहिल्या मुद्याकडे कारखानदार आणि शासनानं लक्ष द्यावं.दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सरकारने अशा अडचणी असल्याचं मान्य करून मतदानाचा विचार न करता अशा विषयांवर काम केलंच पाहिजे.प्रश्न – शरद पवार, अजित पवारांबरोबर काम करताना दडपण येतं का?
रोहित पवार – सामान्य लोक साहेबांच्या धोरणांबाबत अंदाज बांधू शकतात. मात्र राजकीय लोकांनी साहेबांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये. दडपण येतं! साहेबांसारखी लीगसी असेल तर नक्कीच येतं.प्रश्न – तुम्ही लग्न कधी करणार आहात?
रोहित पवार – चुकून असा प्रश्न मला विचारून माझ्या अडचणीत का वाढ करता? पंधरा वर्षांपूर्वी विचारलं असतं, तर उत्तर देऊ शकलो असतो.प्रश्न – कुकुटपालन धंदा बरा आहे का? टाकावा म्हणतोय!
रोहित पवार – मग टाका की!प्रश्न – कर्जत-जामखेड की हडपसर?
रोहित पवार – कर्जत-जामखेडनं लढायला शिकवलंय. मी जो आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. तेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे कधीही कर्जत-जामखेडच.प्रश्न – उत्कृष्ट कलाकार.. नाना पाटेकर की नरेंद्र मोदी?
रोहित पवार – या दोन ऑप्शनवरून तुम्हाला राजकारणाबद्दल आणि अभिनयाबद्दल बरंच कळतं असं दिसतंय. उत्तर तुम्हालाही माहिती आहे आणि लोकांनाही कळलंय.प्रश्न – महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं?
रोहित पवार – जर नेत्यांनी ठरवलं, तर भविष्य नक्कीच चांगलं आहे.प्रश्न – राजकारणापलीकडे जाऊन तुमचा विरोधी पक्षातला मित्र कोण?
रोहित पवार – योगेश कदम. भाजपाचेही सांगितले असते. पण त्यांना बरीच बंधनं असल्याने त्यांचा विचार करून नाव सांगत नाहीये!प्रश्न – तामिळनाडू प्रीमियर लीगसारखी महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू व्हायला हवी का?
रोहित पवार – लवकरच…प्रश्न – विलासराव देशमुखांविषयी दोन शब्द…
रोहित पवार – निष्ठा आणि कर्तृत्वप्रश्न – कोणत्या मंत्रालयात तु्म्ही सर्वात चांगलं काम करू शकता?
रोहित पवार – पद महत्त्वाचं नसलं, तरी जिथे युवकांच्या हाताला काम देता येईल, असं मंत्रिपद नक्कीच आवडेल!प्रश्न – आजोबा शरद पवारांकडून कोणत्या गोष्टी शिकलात?
रोहित पवार – गरम वातावरणात डोकं शांत कसं ठेवायचं.प्रश्न – देश की पक्ष?
रोहित पवार – देशप्रश्न – महाराष्ट्रात अशा कोणत्या गोष्टीत बदल करावासा वाटतो?
रोहित पवार – शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीप्रश्न – तुमचा बायोपिक आला, तर तुमचा रोल कुणी करावा असं वाटतं? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर?
रोहित पवार – माझा रोल मलाच करायला आवडेल