• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chandrakant patil on balasaheb thackeray over ayodhya babari masjid ram mandir ssa

Photos : “बाबरी पाडण्यात कदापि शिवसैनिक नव्हते,” चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

“साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला.”

Updated: April 11, 2023 13:20 IST
Follow Us
  • उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक नवीन दावा केला आहे. बाबरी मशिद पाडली, तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, असं विधान चंद्रकांत पाटील व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
    1/9

    उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक नवीन दावा केला आहे. बाबरी मशिद पाडली, तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, असं विधान चंद्रकांत पाटील व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

  • 2/9

    चंद्रकांत पाटील म्हणाले, “बाबरी मशिद पाडून तिथे प्रभू श्री रामाचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. तेव्हा संजय राऊत तिथे होते का?”

  • 3/9

    “साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने दुर्गा वाहिनीच्या नावाने संघर्ष केला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 4/9

    “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठीशी होती. पण, ते उघडपणे सहभागी नव्हते. संघाने आपल्या विचारांच्या संघटनांना कामे वाटून दिली होती.”

  • 5/9

    “बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना तिथे ढाचा पाडण्यासाठी गेली होती का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

  • 6/9

    “कारसेवक हे हिंदू होते. हे कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली बाबरी पाडण्यासाठी गेले होते,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  • 7/9

    “बाबरी पाडली, त्यात कदापि शिवसैनिक नव्हते. कारसेवकांची सेवा करण्यासाठी महिनाभर अयोध्येत होतो. सुशील मोदी, हरेंद्र कुमार आणि मी असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस अयोध्येत होतो.”

  • 8/9

    “आम्ही सभा आणि संतांची व्यवस्था तिथे करायचे. आम्हाला सांगण्यात आलं होतं, ढाचा पडो किंवा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यावरच तुम्ही तिथून निघायचे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 9/9

    “आम्ही बाहेर पडल्यावर अयोध्येच्या रस्त्यावर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले, याची जबाबदारी मी घेतो. मग, तुम्ही तुमचे चार सरदार पाठवले होते का?,” असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

TOPICS
चंद्रकांत पाटीलChandrakant Patilबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackeray

Web Title: Chandrakant patil on balasaheb thackeray over ayodhya babari masjid ram mandir ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.