Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray criticize bjp eknath shinde chandrakant patil devendra fadnavis over controversial statement pbs

“मोहन भागवत मशिदीत जाणार, हे मदरशांमध्ये जाऊन कव्वाली, दुसरीकडे…”, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा…

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशिदीला भेट देण्यापासून फडणवीसांच्या बाबरी मशीद दाव्यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा.

April 11, 2023 17:28 IST
Follow Us
  • भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला.
    1/33

    भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला.

  • 2/33

    यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (११ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांसह भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

  • 3/33

    यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशिदीला भेट देण्यापासून फडणवीसांच्या बाबरी मशीद दाव्यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा.

  • 4/33

    बाबरी पाडल्यानंतर इतकी वर्षे उलटली. त्यानंतर आता खंदकातले उंदीर बाहेर येत आहेत – उद्धव ठाकरे

  • 5/33

    चंद्रकांत पाटील यांनी जो काही उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडणं आहे – उद्धव ठाकरे

  • 6/33

    असे बरेच उंदीर आता बाबरीच्या आठवणीतून बाहेर येत आहेत. ज्याला काही अर्थ नाही – उद्धव ठाकरे

  • 7/33

    जेव्हा बाबरी पडली तेव्हा तिथे आपले आत्ताचे माननीय पंतप्रधान हे त्यावेळी हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचंही नाव समोर आलं नव्हतं – उद्धव ठाकरे

  • 8/33

    संतापजनक गोष्ट ही आहे की जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपून बसले होते. कुणीही बाहेर यायला तयार नव्हता – उद्धव ठाकरे

  • 9/33

    सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून जाहीर केलं होतं की बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता – उद्धव ठाकरे

  • 10/33

    ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. संजय राऊत यांचा फोन आला होता. बाळासाहेबांना मी सांगितलं की बाबरी पाडली. बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे – उद्धव ठाकरे

  • 11/33

    बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्व? असं नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही – उद्धव ठाकरे

  • 12/33

    त्यावेळी कुणी शाळेच्या सहलीला गेले होते आणि सांगतात माझ्या आजूबाजूने गोळ्या गेल्या होत्या – उद्धव ठाकरे

  • 13/33

    कोणी म्हणतं या तुरुंगात होतो, कुणी म्हणतं त्या तुरुंगात होतो. इतके दिवस का गप्प होतात? – उद्धव ठाकरे

  • 14/33

    मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा भरकटलेला पक्ष हिंदूंचा इतिहासही पुसणार आहेत का? – उद्धव ठाकरे

  • 15/33

    बाबरी पडल्यानंतर जी दंगल मुंबईत उसळली त्यावेळी शिवसेनेने मुंबई आणि मराठी वाचवली आहे – उद्धव ठाकरे

  • 16/33

    आता अयोध्येत राम मंदिरात दर्शनासाठी दुनिया जाते आहे. आम्ही जेव्हा अयोध्येत जात होतो तेव्हा राम मंदिराचा प्रश्न बासनात गुंडळाला होता – उद्धव ठाकरे

  • 17/33

    राम मंदिर बांधण्याचं काम होत आहे कारण कोर्टाने हा निर्णय दिला. त्यासाठी विशेष कायदा हा मोदींनी केलेला नाही – उद्धव ठाकरे

  • 18/33

    भाजपाचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे ते देशाच्या कामाचं नाही – उद्धव ठाकरे

  • 19/33

    बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन सत्तेवर बसला आहात ना? आता भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान भाजपाने केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे कुणाला जोडा मारणार आहेत? – उद्धव ठाकरे

  • 20/33

    भाजपा हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर भरकटलेला जनता पक्ष असा आहे. या भरकटलेल्या पक्षासोबत किती दिवस बसणार – उद्धव ठाकरे

  • 21/33

    कसं आहे ते पटकन उत्तर देतात ना? मी बोलत असताना शिंदेंनी काय बोलायचं आहे ती स्क्रिप्ट भाजपाच्या कार्यालयात टाइप होत असेल – उद्धव ठाकरे

  • 22/33

    ती मुख्यमंत्र्यांना वाचू द्या, नीट पाठ करूद्या बघू ते काय म्हणतात – उद्धव ठाकरे

  • 23/33

    ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहे, त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी

  • 24/33

    एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत – उद्धव ठाकरे

  • 25/33

    दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? – उद्धव ठाकरे

  • 26/33

    मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे? – उद्धव ठाकरे

  • 27/33

    आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला – उद्धव ठाकरे

  • 28/33

    तसेच बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले – उद्धव ठाकरे

  • 29/33

    आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे – उद्धव ठाकरे

  • 30/33

    आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? – उद्धव ठाकरे

  • 31/33

    ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत – उद्धव ठाकरे

  • 32/33

    त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही. मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत – उद्धव ठाकरे

  • 33/33

    सर्व छायाचित्र (संग्रहित)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayचंद्रकांत पाटीलChandrakant Patilभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Uddhav thackeray criticize bjp eknath shinde chandrakant patil devendra fadnavis over controversial statement pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.