• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know what are the serious allegations made by congress ankita dutta on iyc president srinivas pbs

“ते मला म्हणाले की, तू व्होडका पिते का? आणि…”, वाचा महिला नेत्याने युवक काँग्रेस अध्यक्षावर केलेले नेमके आरोप काय?

काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

Updated: April 19, 2023 20:44 IST
Follow Us
  • काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
    1/35

    काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/35

    विशेष म्हणजे श्रीनिवास राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.

  • 3/35

    विशेष म्हणजे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्यांनी नमूद केली.

  • 4/35

    यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्या बुधवारी (१९ एप्रिल) एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या. त्यांनी नेमके काय आरोप केले त्याचा हा आढावा…

  • 5/35

    मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि सचिव वर्धन यादव माझा छळ करत आहेत – अंकिता दत्ता

  • 6/35

    वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही – अंकिता दत्ता

  • 7/35

    ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत – अंकिता दत्ता

  • 8/35

    मी याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, अद्यापही यावर चौकशी समिती नेमण्यात आली नाही – अंकिता दत्ता

  • 9/35

    रायपुरमधील अधिवेशनादरम्यान मी सभामंडपात प्रवेश करत असताना श्रीनिवास व्ही. बी. समोरून येत होते – अंकिता दत्ता

  • 10/35

    ते मला म्हणाले की, तू काय पिऊन मेसेज करते. तू व्होडका पिते का? – अंकिता दत्ता

  • 11/35

    युवक काँग्रेसचे अध्यक्ष एका राज्याच्या महिला अध्यक्षाबरोबर असं बोलताना पाहून मला धक्का बसला – अंकिता दत्ता

  • 12/35

    धक्का बसल्याने मी शांत राहिले. त्यानंतर मी श्रीनिवास यांनी अशाप्रकारे वर्तन केल्याची तक्रार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे, सरचिटणीसांकडे केली – अंकिता दत्ता

  • 13/35

    हे अगदीच सहन केलं जाऊ शकत नाही – अंकिता दत्ता

  • 14/35

    श्रीनिवास आणि वर्धन यांच्याविरोधात अद्यापही चौकशी समिती नेमलेली नाही ही मुख्य अडचण आहे – अंकिता दत्ता

  • 15/35

    हाच माझ्यासाठी काळजीचा मुद्दा आहे – अंकिता दत्ता

  • 16/35

    मी वारंवार त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे – अंकिता दत्ता

  • 17/35

    ते आता सोशल मीडियावर माझे पोस्टर्स शेअर करत आहेत – अंकिता दत्ता

  • 18/35

    वर्धन यादव यांनी माझा आणि आसाम मुख्यमंत्री हिमांतू शर्मा यांचा फोटो शेअर करत मी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. माझ्याकडे त्याचे स्क्रिनशॉटही आहेत – अंकिता दत्ता

  • 19/35

    म्हणजे एखादी महिला तिच्या स्वसन्मानावर बोलत असेल, ती ज्या छळाला सामोरं जाते त्यावर बोलत असेल, तर पक्षाने अशाप्रकारे प्रतिक्रिया द्यायला हवी का? – अंकिता दत्ता

  • 20/35

    माझे वडील मृत्यूशय्येवर असताना आसाम काँग्रेसचे अध्यक्ष होते – अंकिता दत्ता

  • 21/35

    माझे आजोबा, वडील आणि मी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत – अंकिता दत्ता

  • 22/35

    आम्हाला पक्ष सोडण्याची गरज नाही – अंकिता दत्ता

  • 23/35

    त्यांना आम्हाला पक्षातून काढायचं असेल, तर त्यांनी काढावं. मात्र, आमचं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे – अंकिता दत्ता

  • 24/35

    श्रीनिवास आणि वर्धन यांच्यासारख्या लोकांनी पक्ष उद्ध्वस्त केला आहे – अंकिता दत्ता

  • 25/35

    त्यांनी राज्यातील राजकारण उद्ध्वस्त केलं आहे – अंकिता दत्ता

  • 26/35

    महिलेबरोबर अशाप्रकारचं वर्तन करणारा व्यक्ती युवक काँग्रेसचं नेतृत्व कसं करू शकतो? – अंकिता दत्ता

  • 27/35

    ते मला म्हणतात की, ही मुलगी बदनाम झाली आहे – अंकिता दत्ता

  • 28/35

    ते माझ्याविरोधातील ईडी-सीबीआय प्रकरणं उकरत आहेत – अंकिता दत्ता

  • 29/35

    ही प्रकरणं मागील वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली. मी एकटी या प्रकरणांविरोधात लढत आहे – अंकिता दत्ता

  • 30/35

    मला जर भाजपातच जायचं असतं, तर ऑगस्ट त्यासाठी चांगली वेळ होती – अंकिता दत्ता

  • 31/35

    मला वडील नाहीत, मला पती नाही, मी माझी आई आणि तीन बहिणींबरोबर या प्रकरणांचा सामना करत आहे – अंकिता दत्ता

  • 32/35

    आम्ही चुकीचे नाहीत त्यामुळेच आम्ही याच्या विरोधात लढत आहोत – अंकिता दत्ता

  • 33/35

    मात्र, मी पक्षातील लिंगभेदभावाविरोधात तक्रार केल्याने पक्षाने असं वागावं का?” – अंकिता दत्ता

  • 34/35

    एकूणच या प्रकरणामुळे काँग्रेसवर नाचक्कीची वेळ आली आहे.

  • 35/35

    सर्व छायाचित्र – अंकिता दत्ता ट्विटर

TOPICS
काँग्रेसCongressराहुल गांधीRahul Gandhiसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Know what are the serious allegations made by congress ankita dutta on iyc president srinivas pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.