-
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी ( २१ एप्रिल ) एका वृत्तसमूहाला मुलाखत दिली. यावेळी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याची खंतही व्यक्त केली आहे.
-
“आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल,” अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
-
अजित पवार म्हणाले, “सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते.”
-
“त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते.”
-
“पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते, तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते,” असं अजित पवारांनी सांगितलं.
-
“तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता.”
-
“ठाकरे यांच्याबरोबर आनंदाने, समाधानाने काम केलं. मात्र, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केलं,” असं खुलासा अजित पवारांनी केला आहे.
-
शिवसेनेतील बंडखोरी बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आमच्या कानावर सातत्याने येत होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते.”
-
“शिंदे यांना ठाण्यातील अधिकारी नेमण्याचे सर्वाधिकार दिले होते. बंडखोरीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी आमदार जिथे असतील. तेथून त्यांना मातोश्रीवर आणण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या होत्या.”
-
“पण, अधिका-यांनी शिंदे यांच्यासोबत निष्ठा ठेवत त्यांच्यासह आमदारांना सुरळीतपणे मुंबईबाहेर जावू दिले,” असं अजित पवारांनी सांगितलं.
-
“२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांना ज्याप्रमाणे नेत्यांनी एकत्र ठेवले.”
-
“त्याचप्रमाणे शिवसेनेतील बंडावेळी तीन पक्षाच्या नेत्यांनी आमदारांना एकत्र ठेवले असते, तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
“…तर आर.आर पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते”, अजित पवारांचं विधान
“उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाणांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता, त्यामुळे…”, असंही अजित पवार म्हणाले.
Web Title: R r patil chief minister national congress party maharashtra 2004 say ajit pawar in pune ssa