-
शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.
-
“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको आहे,” असं सांगताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.
-
त्या छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणातील घराणेशाहीवरही टीका केली.
-
महाराष्ट्रातील राजकारणात घाणेरडेपणा सुरू आहे. तो घाणेरडेपणा घराणेशाहीचा आणि हुकुमशाहीचा आहे – करुणा मुंडे
-
लोकशाही संपवली जात आहे. त्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेने पक्ष काढला आहे – करुणा मुंडे
-
तसेच मी घराणेशाही संपवण्याची सुरुवात माझ्यापासून केली आहे – करुणा मुंडे
-
माझा मुंडे खानदानाचा एकच मुलगा आहे. त्याचं नाव सुशील धनंजय मुंडे असं आहे. मी त्याला आज, उद्या, कधीही राजकारणात आणणार नाही – करुणा मुंडे
-
धनंजय मुंडे माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे – करुणा मुंडे
-
आता घराणेशाही संपली. कारण धनंजय मुंडेंनी माझा तिरस्कार केला आहे – करुणा मुंडे
-
धनंजय मुंडेंनी २७ वर्षानंतर मला रस्त्यावर सोडलं, तेव्हापासूनच माझी लढाई सुरू झाली आहे – करुणा मुंडे
-
ज्या दिवशी त्यांनी मला सोडलं, तेव्हापासून घराणेशाही संपली. आता मी घराणेशाहीत नाही – करुणा मुंडे
-
मी आता नवऱ्याबरोबर नाही. त्यामुळे ही घराणेशाही होणार नाही – करुणा मुंडे
-
मी आज स्वतःच्या मुलाला घरात ठेऊन गोरगरीब जनतेला, गावोगावी, दारोदारी जाऊन भेटत आहे – करुणा मुंडे
-
मी त्यांना एकच विनंती करत आहे की, नव्या लोकांनी पुढे यावं – करुणा मुंडे
-
मी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या सगळीकडे बाजार समितीच्या निवडणुका आहेत – करुणा मुंडे
-
त्या निवडणुकीत खूप घाणेरडापणा सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहेत. त्याचा मी लवकरच भांडाफोड करणार आहे – करुणा मुंडे
-
मी जो गौप्यस्फोट करणार आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सगळे लोक बघू शकतात – करुणा मुंडे
-
दोन दिवसांनी माझ्याकडे एक व्हिडीओ येणार आहे. तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार आहे – करुणा मुंडे
-
सध्या माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे आहेत. व्हिडीओ आला की मी हा भांडाफोड करणार आहे – करुणा मुंडे
“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको, आता…”, करुणा मुंडेंचा हल्लाबोल
शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचा आढावा…
Web Title: Serious allegations of karuna munde on dhananjay munde maharashtra politics ncp pbs