• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. amritpal singh arrest in punjab rode village cm bhagwant mann pmw

“गोळ्या झाडू नका”, अमृतपाल सिंगच्या अटकेवेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश; वाचा रात्रीच्या सहा तासांतला कारवाईचा थरार!

वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला अखेर ३६ दिवसांच्या पाठलागानंतर पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेच्या घडामोडी मोठ्या रंजक ठरल्या! (सर्व फोटो – पीटीआय/एएनआय संग्रहीत)

Updated: April 25, 2023 17:01 IST
Follow Us
  • Amritpal Singh arrest punjab police
    1/19

    अमृतपाल सिंगला २३ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पंजाबच्या मोगामधल्या रोड गावातल्या एका गुरुद्वारामध्ये तो लपून बसला होता.

  • 2/19

    या गावात अमृतपाल येणार याची खात्रीच गुप्तचर विभागाला होती. कारण ज्या भिंद्रनवालेंना अमृतपाल आपला आदर्श मानतो, त्यांचं हे मूळ गाव!

  • 3/19

    २२ एप्रिलची मध्यरात्र ते २३ एप्रिलची सकाळ या साधारणपणे सहा तासांच्या घडामोडी एखाद्या गुन्हेगारी कथानकावरील चित्रपटाला साजेसं ठरलं.

  • 4/19

    १८ मार्चला पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल सिंगनं पोबारा केला होता. तेव्हापासून गेल्या ३६ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.

  • 5/19

    आधी अमृतपालनं शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर त्याच्याकडे पळून जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहिला नसल्यामुळे परिणामी त्याला अटक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • 6/19

    २२ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी एक फोन गेला. हा फोन गुप्तचर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा होता.

  • 7/19

    अमृतपाल रोड गावातल्या गुरुद्वारामध्ये लपल्याची खात्रीशीर माहिती या अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना दिली.

  • 8/19

    इथून पुढे सुरू झाल्या ‘ऑपरेशन अमृतपाल’च्या घडामोडी मुख्यमंत्री मान यांनी लागलीच पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना फोन करून कारवाईचे आदेश दिले.

  • 9/19

    मात्र, हे करताना गुरुद्वाराचं पावित्र्य राखलं जाईल, याची खातरजमा करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

  • 10/19

    इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की अशी कोणतीही घटना तिथे घडू नये ज्याचे परिणाम राज्याला दीर्घकाळ भोगावे लागतील.

  • 11/19

    अमृतपालला अटक करताना एकही गोळी न झाडण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले होते.पोलीस गुरुद्वारामध्ये प्रवेश करणार नाहीत, अशी ताकीदही त्यांनी दिली.

  • 12/19

    अमृतपाल सिंग रोड गावात असल्याचं समजल्यानंतर तातडीने सूत्र हलली. संपूर्ण गावाची नाकेबंदी करण्यात आली.

  • 13/19

    पोलीस फौजफाटा गावात गेल्यामुळे कोणतीही गडबड-गोंधळ होऊ नये. त्यासाठी सर्व पोलीस साध्या वेशात गावात पाठवण्याचे पोलिसांना आदेश होते.

  • 14/19

    अमृतपाल सिंगला अटक केल्यानंतर त्याचे राज्यभर काही वेगळे पडसाद उमटू शकतात का, याची खात्री आधीच घेण्यात आली होती.

  • 15/19

    पोलिसांनी संपूर्ण गावाची नाकेबंदी केल्यानंतर आणि गावभर पोलीस साध्या वेशात सज्ज झाल्यानंतरच रोडमधील त्या गुरुद्वारामध्ये अमृतपालला संदेश पाठवण्यात आला.

  • 16/19

    जेव्हा अमृतपाल सिंगला हे पटलं की आता हातपाय हलवून काहीही साध्य होणार नाही तेव्हा सकाळी ७ च्या सुमारास तो गुरुद्वाराबाहेर आला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.

  • 17/19

    दरम्यान, अमृतपाल सिंग यानं गुरुद्वारातून बाहेर येण्याआधी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात तो शरणागती पत्करत असल्याचा दावा त्यानं केला होता. मात्र, नंतर त्याला अटकच केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 18/19

    अमृतपाल सिंग फरार असताना गुरुद्वारांमध्ये आसरा घ्यायचा. त्यामुळे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रमुख गुरुद्वारांवर नजर ठेवली. खासकरून रोडमधल्या गुरुद्वारावर!

  • 19/19

    १८ मार्चला त्याचा पाठलाग करताना त्याच्यावर जाणूनबुजून गोळीबार न करण्याचं पोलिसांचं धोरण होतं. त्यामुळे तो एकटा पडला आणि त्याच्याकडे गुरुद्वारामध्ये शरण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

TOPICS
अमृतपाल सिंगAmritpal Singhनॅशनल न्यूजNational NewsपंजाबPunjabभगवंत मानBhagwant Mannमराठी बातम्याMarathi News

Web Title: Amritpal singh arrest in punjab rode village cm bhagwant mann pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.