• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hm amit shah four question uddhav thackeray reply in mumbai ssa

PHOTOS: अमित शाहांचे ‘ते’ चार प्रश्न, उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्यत्तुर; म्हणाले…

“५-६ वर्ष झाली अजून काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.

Updated: June 18, 2023 22:18 IST
Follow Us
  • शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईत पार पडलं. यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं.
    1/9

    शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईत पार पडलं. यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं.

  • 2/9

    तसेच, काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चार प्रश्न विचारले होते.

  • 3/9

    मुस्लीम आरक्षण, तीन तलाक, समान नागरी कायदा, राम मंदिर यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अमित शाहांनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • 4/9

    “तुम्हाला कुणी अदानीवर प्रश्न विचारला, तर तुमची बोबडी वळते. तुम्ही राहुल गांधींना घराबाहेर काढता, आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार का?,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • 5/9

    “समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे. संपूर्ण देशभरात गोवंश बंदी कायदा आणू शकत नाही, समान नागरी कायदा काय आणणार? आम्ही असताना महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम दंगली का झाल्या नाहीत? काश्मीर आणि मणिपूरमध्ये जाऊन हिंदू जनआक्रोश करा, कारण तिकडेही हिंदूच मरत आहेत,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

  • 6/9

    “३७० कलम काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेना होती. ५-६ वर्ष झाली अजून काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही? याचं उत्तर अमित शाह यांनी द्यावं. अजूनही हिंदू असुरक्षित का आहे?,” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

  • 7/9

    “आम्ही काँग्रेससोबत गेलो, कारण तुम्ही आम्हाला ढकललंत म्हणून जावं लागलं. तेव्हा युती होती, आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा लावलात. आज मी आव्हान देतोय तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन या, आम्ही माझ्या वडिलांचा घेऊन येतो, बघू कोण जिंकतंय,” असा आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं आहे.

  • 8/9

    “कर्नाटकमध्ये मोदींचाच चेहरा लावला होता. मग मोदींचा चेहरा, मोदींची जादू कुठे गेली?,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

  • 9/9

    “इच्छा नव्हती तरी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. आव्हान होतं, परतीचे दोर कापले होते. अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. अरविंद सावंत यांनी माझं काय चुकलं असं विचारलं नाही. जाऊन राजीनामा दिला,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

TOPICS
अमित शाहAmit Shahउद्धव ठाकरेUddhav ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Hm amit shah four question uddhav thackeray reply in mumbai ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.