Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. changdev javalge father of leshpal who save girl from attack express fear about koyata gang pbs

Photos : “…म्हणून मी लेशपालला आपल्या घरी निघून ये म्हणालो”, मुलाने तरुणीचा कोयता हल्ल्यात जीव वाचवल्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया

पुण्यात कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनी पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करत मनातील भीती व्यक्त केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: July 3, 2023 11:32 IST
Follow Us
  • पुण्यात लेशपाल जवळगे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून भरदिवसा एका माथेफिरूने केलेल्या कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला.
    1/21

    पुण्यात लेशपाल जवळगे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून भरदिवसा एका माथेफिरूने केलेल्या कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला.

  • 2/21

    यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वच स्तरातून लेशपाल जवळगेचं कौतूक होत आहे.**78

  • 3/21

    अशातच आता लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनी पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करत मनातील भीती व्यक्त केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 4/21

    तिकडे पुण्यात कोयते गँगच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे त्याला काही झालं, तर अशी भीती मनात येते – चांगदेव जवळगे

  • 5/21

    आपला एकुलता एक मुलगा आहे, आपण त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, तर असं वेगळं काही घडू नये असं वाटतं – चांगदेव जवळगे

  • 6/21

    मुलीचा प्राण वाचवला हे चांगलं काम केलं आहे. त्याचा अभिमान वाटतो – चांगदेव जवळगे

  • 7/21

    माझी दोन्ही मुलं इंजिनीयर आहेत. मुलगा मॅकेनिकल इंजिनीयर आहे, तर मुलगी सिव्हिल इंजिनीयर आहे – चांगदेव जवळगे

  • 8/21

    इंजिनीयर झाल्यानंतर मुलाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं म्हटलं. आम्ही त्याला कर म्हटलं – चांगदेव जवळगे

  • 9/21

    एकुलता एक मुलगा आहे आणि त्याची इच्छा आहे. आम्ही जे करतो ते त्याच्यासाठीच करतो आहे. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे तो अभ्यास करत आहे – चांगदेव जवळगे

  • 10/21

    लेशपालने जे कर्तव्य पार पाडलं ते चांगलं केलं असं वाटतं. मला त्याचा अभिमान वाटतो. खेडेगावातील माणसानं असं कर्तुत्व करणं महत्त्वाचं आहे – चांगदेव जवळगे

  • 11/21

    हा प्रकार घडल्यावर लेशपालच्या बहिणीचा फोन आला आणि तिने तुम्हाला काही समजलं का असं विचारलं – चांगदेव जवळगे

  • 12/21

    त्यावर मी मला काही कळालं नाही, आमची शेतातील कामंच सुरू आहेत असं सांगितलं. त्यावर तिने लेशपालने (बापू) मुलीचा प्राण वाचवला असं सांगितलं – चांगदेव जवळगे

  • 13/21

    दर्शना पवारचं प्रकरण झाल्यामुळे मी लेशपालला आदल्या दिवशीच फोन केला होता – चांगदेव जवळगे

  • 14/21

    मी म्हटलं होतं की, तुम्ही दोघं बहिण-भावंडं तिथं आहात. नीट वागा, नाहीतर अशा घटना घडत असतील तर आपल्या घरी निघून या – चांगदेव जवळगे

  • 15/21

    त्यामुळे मुलीने या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला तेव्हा मला तसंच वाटलं. तेव्हा मुलीने सांगितलं की, तसं काही नाही – चांगदेव जवळगे

  • 16/21

    मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन पळत चालला होता. त्यावेळी लेशपाल अभ्यासासाठी ग्रंथालयात चालला होता. त्याच्यासमोर ही घटना घडली त्यामुळे त्याने कोयता धरला आणि मुलीचा प्राण वाचवला, असं मुलीने सांगितलं – चांगदेव जवळगे

  • 17/21

    मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन पळत चालला होता. त्यावेळी लेशपाल अभ्यासासाठी ग्रंथालयात चालला होता. त्याच्यासमोर ही घटना घडली त्यामुळे त्याने कोयता धरला आणि मुलीचा प्राण वाचवला, असं मुलीने सांगितलं – चांगदेव जवळगे

  • 18/21

    यानंतर मग मी बरं बरं, त्याने चांगलं काम केलं असं म्हटलं. – चांगदेव जवळगे

  • 19/21

    आता मनात धाकधूक वाटते. डोक्यात अनेक प्रश्न येतात. एका दुकानदाराने शटर ओढलं होतं. त्यांना अपमान वाटला असेल तर काय – चांगदेव जवळगे

  • 20/21

    आपल्याला अभ्यास करायचा आहे, तिथं रहायचं आहे. त्यामुळे त्यांनी काही वैर ठेऊ नये. असं काही मनात आणू नये, पण शेवटी मनात येतं – चांगदेव जवळगे

  • 21/21

    सर्व छायाचित्र – लेशपाल जवळगे इंस्टाग्राम व लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
क्राईम न्यूजCrime NewsपुणेPuneपुणे पोलिसPune Police

Web Title: Changdev javalge father of leshpal who save girl from attack express fear about koyata gang pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.