-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ते पक्ष नाव आणि चिन्हावर दावा यावर प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे ते समजून घेऊया…
-
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. पक्षातील बहुमत अजित पवारांच्या पाठिशी आहे.पक्ष म्हणून चिन्हाची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे.”
-
“राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार सर्व काही सुरु आहे. अजित पवारांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली आहे. अजित पवारांकडून माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली.”
-
“दिल्लीत शरद पवार यांची झालेली बैठक अधिकृत नाही.”
-
“राष्ट्रवादीच्या पक्षीय बांधणीत नियमांची पायमल्ली झाली होती.”
-
“जयंत पाटील यांची नियुक्ती घटनेनुसार नाही. त्यांना आम्हाला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही.”
-
“निवडणूक आयोगातल्या याचिकेची सुनावणी होईलपर्यंत, कुणी कुठलीही कारवाई करु शकत नाहीत.”
-
“आमचे निर्णय अधिकृत आहेत. शरद पवार यांच्या गटाने घेतलेले निर्णय अनधिकृत आहेत.”
-
“पक्षाचे कार्यालय आमचं आहे, असं गृहित धरून रस्त्यावरील लढाई करण्यासाठी आम्ही उतरू इच्छित नाही. कारण, असं चुकीचं काम करून कोणालाही फायदा होणार नाही.” ( छायाचित्र – गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस )
PHOTOS : अजित पवार यांची पत्रकार परिषद : प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणातील ‘हे’ आठ मोठे मुद्दे
“अजित पवारांकडून माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
Web Title: Prafull patel on sharad pawar jayant patil ncp name and slogan ssa