-
भाजपा ‘महाविजय २०२४’ या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आज ( १३ जुलै ) केलं होतं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
-
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे. तर, राष्ट्रवादीशी असलेली युती ही राजकीय मैत्री आहे,” असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केलं.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले. तर, कुणी म्हणते घर फोडले. पण, याची सुरूवात कोणी केली? जनादेशाची हत्या करण्याचं काम २०१९ साली कुणी केलं? पक्ष फोडले, असं बोलणाऱ्यांना माझा सवाल आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार पवार हे काय छोटे नेते आहेत का? काल राजकारण आलेत का? की मी मोहिनी टाकली आणि माझ्यामागे येतील. ते विचारपूर्वक आले आहेत. जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, त्या-त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील.”
-
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे. ती २५ वर्षाची आमची मैत्री आहे. आम्ही एका विचाराने बरोबर आलेले लोक आहोत.”
-
“राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढील १० ते १५ वर्षात तीही भावनिक मैत्री होईल,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
-
“अलीकडच्या काळात काही लोक खोट्या शपथा घेत आहेत. किमान पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेताना मनात त्यांनी माफी मागितली असेल की, राजकारणासाठी मला खोटी शपथ घ्यायची आहे. त्यामुळे मला माफ कर. निश्चित देवी त्यांना माफ करेल,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
PHOTOS: “शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक, तर राष्ट्रवादीशी…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
“अलीकडच्या काळात काही लोक खोट्या शपथा घेत आहेत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
Web Title: Eknath shinde shivsena emotional and ncp friendly alliance say devendra fadnavis ssa