• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. irshalgad landslide photos on thakurwadi village ndrf cm eknath shinde on spot pmw

…अन् काही क्षणांत समोर मातीचा ढीग झाला; ईर्शाळवाडीवर दरड कोसळली, गावाची ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्यं!

बुधवारी रात्रीच्या सुमारास रायगडाच्या ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली असून ३० ते ४० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत.ो

Updated: July 20, 2023 09:47 IST
Follow Us
  • irshalgad thakurwadi landslide
    1/16

    माळीण किंवा तळीये दुर्घटनेच्या आठवणी एका क्षणात ताज्या करणारी दुर्घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

  • 2/16

    रायगड जिल्ह्यात ईर्शाळगडावरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे गावातल्या अनेक घरांवर अक्षरश: मातीचा ढीग झाला

  • 3/16

    ईर्शाळवाडीतल्या ठाकुरवाडी या गावावर दरड कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या गावात ३० ते ४० कुटुंब असल्याचं सांगितलं जात आहे.

  • 4/16

    मध्यरात्रीच्या सुमारास आख्खा गाव पावसामुळे आपापल्या घरांत होता. घराघरांत निजानीज झालेली असतानाच ईर्शाळगडावरून भूस्खलन झालं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं!

  • 5/16

    ईर्शाळवाडी गाव ईर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर आहे. मात्र, तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार झालेला नाही.

  • 6/16

    पक्का रस्त्ता नसल्यामुळे एनडीआरएफच्या सुरक्षा पथकांना जेसीबी, पोकलेनसारख्या मोठ्या यंत्रणा गावापर्यंत नेण्यात मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे इतर हत्यारांच्या साहाय्यानेच मातीचा ढिगारा उपसण्याचं काम हाती घेतलं गेलं.

  • 7/16

    एनडीआरएफला या दुर्घटनेची माहिती मिळताच दोन पथकं घटनास्थळी तातडीने रवाना झाली. त्यापाठोपाठ मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी पोहोचले.

  • 8/16

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबईत अधिवेशनाच्या कामात असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडाच्या दिशेने रवाना झाले. सकाळी ७ च्या सुमारास ते ईर्शाळवाडी गावात पोहोचले.

  • 9/16

    ईर्शाळवाडीत साधारणपणे २१० घरं असून यातील ठाकुरवाडीतील घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • 10/16

    या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले असावेत, याविषयी कोणतीही खात्रीशीर माहिती मिळत नसल्यामुळे नातेवाईकांच्या दु:खाला पारावार उरला नाही.

  • 11/16

    दरडीखाली आलेल्या घरांच्या मलब्यातून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न बचाव पथकांकडून केले जात आहेत.

  • 12/16

    दरड कोसळल्यानंतर ठाकूरवाडी गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 13/16

    अचानक दरड कोसळल्यामुळे अनेक घरं काही क्षणात भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 14/16

    या सर्व घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून आहेत.

  • 15/16

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सकाळी ७ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 16/16

    घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांकडून नेमकं काय घडलं याची माहिती घेतली.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeपाऊसRainमराठी बातम्याMarathi NewsरायगडRaigad

Web Title: Irshalgad landslide photos on thakurwadi village ndrf cm eknath shinde on spot pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.