-

१० ऑगस्टपर्यंत एकनाथ शिंदे अपात्र ठरतील आणि अजित पवार मुख्यमंत्री बनतील, असं दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकवेळा केला होता. याला आता विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
“पृथ्वीराज चव्हाण ज्योतिषी पाहायला लागले. म्हणाले मुख्यमंत्री जाणार आणि नवीन येणार… माझ्या जिल्ह्यातील माणसाला माझा काय त्रास झालाय?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
-
“पंतप्रधान मोदींना आम्ही सहकुटुंब भेटण्यास गेलो होतो. त्यांनी चांगलं ट्वीट केलं. त्याबद्दल फार समाधान वाटलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कोणताही वाद नाही. फक्त जेव्हा आपण सांगतात, जाणार… जाणार… तेव्हा खुट्टा अधिक बळकट होतो,” असा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
-
“वर्षभर आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणून हिणवलं जातयं. पण, याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हे पाहिलं पाहिजे.”
-
“ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी, शिवसैनिकांशी आणि आपल्या परिवाराशीही गद्दारी आणि बेईमानी केली. मग ते कोण? या गोष्टी बोलायला मला आवडत नाही.”
-
“आपण ज्यांच्याबरोबर निवडून आलो, त्यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केलं. मग, बेईमानी आणि गद्दार कोणी केली? खूप गोष्टी बोलता येतात. संयम बाळगतो, याचा अर्थ आम्हाला काही माहिती नाही, असं समजू नयेत. अरे आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करतात. रोज शिव्या श्राप देतात. दुसरीकडे आमच्याकडचे ५० कोटी रुपये द्या, म्हणून पत्र देता. खरे खोकेबाजे आणि खोकेबाज कोण?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
“…तेव्हा खुट्टा अधिक बळकट होतो”, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना एकनाथ शिंदेंचं सडेतोड प्रत्युत्तर
“महाराष्ट्राच्या मतदारांशी, शिवसैनिकांशी आणि आपल्या परिवाराशीही गद्दारी आणि बेईमानी केली. मग ते…”, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
Web Title: Eknath shinde reply prithviraj chavan and opposition leader over cm change ssa