• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. india space research organisation isro set to launch its first aditya l1 mission information earth sun photos sdn

Aditya-L1 Mission बद्दलच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?

‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे.

Updated: September 2, 2023 10:18 IST
Follow Us
  • Aditya-L1 Mission Information Photos
    1/19

    ISRO First Solar Mission: चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) ‘आदित्य एल१’ हे यान सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सूर्याकडे झेपावेल.

  • 2/19

    त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल.

  • 3/19

    ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे.

  • 4/19

    त्याची उलटगणती सुरू झाल्याचे ‘इस्रो’ने शुक्रवारी सांगितले.

  • 5/19

    ‘आदित्य एल१’ला अचूक कक्षा (एल १ लॅग्रॅन्जिअन पॉईंट) गाठण्यासाठी १२५ दिवसांचा कालावधी लागेल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.

  • 6/19

    पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ची रचना करण्यात आली आहे.

  • 7/19

    पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील असे पाच बिंदू (लॅग्रॅन्जिअन पॉइंट) आहेत.

  • 8/19

    त्या बिंदूंवरून सूर्याचा अभ्यास करणे विशेष व महत्त्वाचे असते.

  • 9/19

    त्यातील ‘एल १’ या बिंदूचा वापर ‘आदित्य एल १’ या मोहिमेत केला जाणार आहे.

  • 10/19

    ‘एल१’बिंदूवरून सूर्याचे विनाअडथळा (ग्रहणाविना) निरीक्षण करण्याची मोठी संधी ‘आदित्य एल१’ला मिळणार आहे.

  • 11/19

    सूर्य हा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याचा सखोल अभ्यास केला जाऊ शकतो, असे ‘इस्रो’ने या गुंतागुंतीच्या मोहिमेची माहिती देताना सांगितले.

  • 12/19

    सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.

  • 13/19

    सूर्यामुळे उद्रेकाच्या अनेक घटना घडतात.

  • 14/19

    तो सौर मंडळामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतो.

  • 15/19

    अशा प्रकारच्या स्फोटक सौर घटना घडल्या तर पृथ्वीजवळच्या अवकाशात विविध प्रकारचे परिणाम संभवतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

  • 16/19

    ‘इस्रो’चा शक्तिशाली ‘पीएसएलव्ही सी५७’ वाहक हा Aditya L 1 (ज्याच्यावर सात वैज्ञानिक उपकरणे आहेत) या यानासह अवकाशात झेप घेईल.

  • 17/19

    सात उपकरणे सूर्याचा अभ्यास करतील, विविध निरीक्षणे नोंदवतील.

  • 18/19

    या मोहिमेद्वारे सूर्याचे प्रकाश क्षेत्र, सूर्याच्या बाहेरील थर, सूर्याचे प्रभामंडल, सूर्याचे तापमान, अतिनील किरणे आदी घटकांचा अभ्यास केला जाईल.

  • 19/19

    (सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)

TOPICS
आदित्य एल१ADITYA L1इस्रोISROमराठी बातम्याMarathi News

Web Title: India space research organisation isro set to launch its first aditya l1 mission information earth sun photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.