• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jarange patil warning govt 10 day maratha reservation chhagan bhujbal and gunaratna sadavarte devendra fadnavis ssa

PHOTOS : मराठा आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम, भुजबळ अन् सदावर्तेंवर हल्लाबोल; जरांगे पाटलांच्या भाषणातील मुद्दे

आंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या सभेला लाखो कार्यकर्ते उपस्थित होते.

October 14, 2023 14:20 IST
Follow Us
  • मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे सभा पार पडली. १५० एकरहून अधिक जागेत पार पडलेल्या या सभेला लाखो मराठा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्तेंना लक्ष्य केलं आहे. जाणून घेऊन भाषणातील ठळक मुद्दे…
    1/9

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे सभा पार पडली. १५० एकरहून अधिक जागेत पार पडलेल्या या सभेला लाखो मराठा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्तेंना लक्ष्य केलं आहे. जाणून घेऊन भाषणातील ठळक मुद्दे…

  • 2/9

    “मराठा समाजाच्यावतीनं माझी सरकारला विनंती आहे. समितीचा, पुराव्याचा घाट घालू नका. मराठा समाज आता सहन करू शकत नाही. २४ ऑक्टोबरनंतर मराठे मागे हटणार नाही. मराठे एकवटले असून रोखणं आता शक्य नाही.” – जरांगे पाटील

  • 3/9

    “मराठ्यांना अंगावर घेऊ नका. मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना आरक्षण दिले, तर गुलालाचे ट्रॅक्टर दिल्लीपर्यंत येतील.” – जरांगे पाटील

  • 4/9

    “मराठा समाज एकत्र होत नाही, हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीनं उत्तर दिलं आहे. कोण म्हणते मराठा एक होत नाही. सरकारला आजच्या गर्दीनं उत्तर दिलं आहे.” – जरांगे पाटील

  • 5/9

    “सरकारला ४० दिवस दिले होते. त्यातील १० दिवस अद्याप शिल्लक आहेत. त्यानंतर तुम्हाला काही विचारणार नाही. आरक्षण दिलं नाहीतर, तुम्हाला दाखवून देऊ.” – जरांगे पाटील

  • 6/9

    “गोरगरीब मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे. मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती बंद करा. केंद्राने आणि राज्यानं मराठ्यांना जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे.” – जरांगे पाटील

  • 7/9

    “लोक १० रूपयेही देत नाही, असं भुजबळ म्हणतात. तुम्हाला लोक पैसे देत नसतील. गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. त्या लोकांचं रक्त पिऊन पैसे कमवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणून तुमच्याकडं धाड पडली. गोरगरीब मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे दोन वर्षे जेलमध्ये बेसन खावं लागलं.” – जरांगे पाटील

  • 8/9

    “एकजण म्हणतो जरांगे पाटलांना अटक करा. मला अटक करणं सोप्पं आहे का? गुणरत्न सदावर्तेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी.” – जरांगे पाटील

  • 9/9

    “२३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघणार.” – जरांगे पाटील ( फोटो सौजन्य – फेसबुक )

TOPICS
गुणरत्न सदावर्तेGunratna Sadavarteछगन भुजबळChhagan Bhujbalमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patil

Web Title: Jarange patil warning govt 10 day maratha reservation chhagan bhujbal and gunaratna sadavarte devendra fadnavis ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.