• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis statement on lalit patil drugs case in mumbai pc pbs

“ही बातमी दिवसभर चालली पाहिजे, नाहीतर तुम्ही…”; भर पत्रकार परिषदेतील फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत केलेली काही वक्तव्य चर्चेत आहेत. ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…

Updated: October 21, 2023 14:41 IST
Follow Us
  • राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका केली.
    1/18

    राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका केली.

  • 2/18

    यावेळी फडणवीसांनी केलेली काही वक्तव्य चर्चेत आहेत. ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…

  • 3/18

    मी ललित पाटील प्रकरणावर बोललो, तर माध्यमं मी ज्या मुख्य विषयासाठी पत्रकार परिषद घेतली तो विषय सोडून हाच मुद्दा दाखवतील – देवेंद्र फडणवीस

  • 4/18

    माध्यमांचा विषय मलाही समजतो. माध्यमं मला ललित पाटील प्रकरणावर विचारतील हे मला माहिती होतं. कारण माध्यमांची या प्रकरणात उत्कंठा आहे – देवेंद्र फडणवीस

  • 5/18

    मात्र, माझी विनंती आहे की, जी मूळ पत्रकार परिषद लाईव्ह झालेली असली, तरी पुन्हा दिवसभर चालली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

  • 6/18

    नाहीतर तुम्ही (माध्यमं) मी ललित पाटील प्रकरणावर बोलल्यावर दिवसभर ललित पाटीलचीच बातमी दाखवाल – देवेंद्र फडणवीस

  • 7/18

    मी आत्ता जे बोलतोय ते सर्व लाईव्ह चाललं आहे हे मला कळतं. इतक्या वर्षात मला हे तर समजलं आहे – देवेंद्र फडणवीस

  • 8/18

    ललित पाटीलला अटक झाली १०/११ डिसेंबर २०२० मध्ये. जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं – देवेंद्र फडणवीस

  • 9/18

    आता आश्चर्य बघा की, गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला – देवेंद्र फडणवीस

  • 10/18

    पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला दाखल झाले. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होते – देवेंद्र फडणवीस

  • 11/18

    यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचं अथवा त्यांचा आजार योग्य नसल्याचं सांगत अर्जही करण्यात आला नाही – देवेंद्र फडणवीस

  • 12/18

    शेवटी १४ व्या दिवशी ललित पाटीलचा एमसीआर करून टाकण्यात आला. त्यामुळे या गुन्ह्यात आम्ही खोलात जात आहे तेव्हा गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही – देवेंद्र फडणवीस

  • 13/18

    उद्या यांच्याविरोधात खटला तयार करायचा आहे, तर काय खटला उभा राहणार आहे. चौकशीच केली नाही – देवेंद्र फडणवीस

  • 14/18

    आता माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशी का करण्यात आली नाही? याला कोण जबाबदार होतं? – देवेंद्र फडणवीस

  • 15/18

    तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार होते की, गृहमंत्री जबाबदार होते? – देवेंद्र फडणवीस

  • 16/18

    त्यावर कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावात हे झालं, यात कुणाचे संबंध होते – देवेंद्र फडणवीस

  • 17/18

    यात खूप गोष्टी आहेत, मात्र त्या मी आज सांगणार नाही – देवेंद्र फडणवीस

  • 18/18

    सर्व छायाचित्रे – संग्रहित व लोकसत्ता ग्राफिक्स टीम

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayड्रग्ज केसDrugs Caseदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisपोलीस भरतीPolice Recruitment

Web Title: Devendra fadnavis statement on lalit patil drugs case in mumbai pc pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.