-
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर-पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या उच्च तीव्रतेच्या भूकंपात १४० लोक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. (फोटो क्रेडिट: सशस्त्र पोलीस दल, नेपाळ)
-
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये 10 किमी खोलीवर होता. (एपी /नेपाळचे पंतप्रधान कार्यालय)
-
NCS नुसार रात्री 11:32 च्या सुमारास नेपाळमधील जुमला या पश्चिमेकडील शहराजवळ भूकंप झाला. नॅशनल भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरच्या म्हणण्यानुसार, नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे 250 मैल ईशान्येस असलेल्या जाजरकोट येथे भूकंपाचे केंद्र होते. (फोटो क्रेडिट: सशस्त्र पोलीस दल, नेपाळ)
-
एपीचे नेपाळ पोलिस प्रवक्ते कुबेर कडायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोट जिल्ह्यात होता, जिथे ९२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आणि ५५ जण जखमी झाल आहेत. तर शेजारच्या रुकुम जिल्ह्यातही ३६ लोकांचा मृत्यू झाला, किमान ८५ जखमींना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. (फोटो क्रेडिट: सशस्त्र पोलीस दल, नेपाळ)
-
नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर जाजरकोटमधील घरांचे नुकसान झाले. (पीटीआय फोटो)
-
नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, “भारत नेपाळच्या लोकांसह एकजुटीने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.” (फोटो क्रेडिट: सशस्त्र पोलीस दल, नेपाळ)
-
काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम जिल्ह्यांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. (पीटीआय फोटो)
-
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी जाजरकोट येथील भूकंपग्रस्त ठिकाणाला भेट दिली (पीटीआय फोटो)
-
नेपाळगंजमध्ये भूकंपग्रस्त भागातून एअरलिफ्ट केलेल्या महिलेला स्ट्रेचरवर नेले जात आहे. नेपाळमध्ये गेल्या एका महिन्यात 6 पेक्षा जास्त तीव्रतेचा हा दुसरा भूकंप होता. यापूर्वी 2 ऑक्टोबरला देशात 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. (एपी फोटो)
-
2015 मध्ये, 7.8 तीव्रतेच्या भूकंपात नेपाळमध्ये सुमारे 9,000 लोक ठार झाले होते आणि सुमारे 10 लाख इमारतींचे नुकसान झाले. (एपी फोटो)
नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर मृतांची संख्या १४० वर! भूकंपग्रस्त भागातील दृश्य पाहून मन होईल सुन्न
Nepal Earthquake Photos Death Toll: नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. भारत नेपाळच्या लोकांसह एकजुटीने उभा आहे असा विश्वास देत मोदींनी मदत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
Web Title: Nepal 6 4 high earthquake death toll croseed 140 pm narendra modi offers help check photos from widely disbursed area svs