• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 13th december proven black day loksabha sansad attack security breach was done via bjp mp pratap simha who are 4 accused svs

लोकसभेतील घुसखोरांना ‘या’ भाजप खासदारानी दिला होता प्रवेशाचा पास; १३ डिसेंबरला पंतप्रधान मोदी कुठे होते?

लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांडया फोडल्याने १३ डिसेंबर पुन्हा ठरला काळा दिवस ठरला आहे, पण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा कुठे होते?

Updated: December 14, 2023 12:32 IST
Follow Us
  • 13th December Proven Black Day Loksabha Sansad Attack Security Breach Was Done Via BJP MP Pratap Simha Who Are 4 Accused
    1/9

    लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांडया फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बरोबर २२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जातेय

  • 2/9

    लोकसभेत तसेच संसदभवन परिसरात धुराच्या नळकांडया फोडणाऱ्या चौघांसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर, मनोरंजन, नीलम व अमोल शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. विरोधकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारला धारेवर धरले

  • 3/9

    लोकसभेमध्ये शून्य प्रहरातील चर्चा सुरू असताना दुपारी १च्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या

  • 4/9

    ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांडया फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले

  • 5/9

    घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम व अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या.

  • 6/9

    लोकसभेत घुसखोरी केलेल्या या दोन तरुणांना Visitors पास देण्यासाठी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी शिफारस केली होती.

  • 7/9

    घटना घडली त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, विधिमंत्री अर्जूनराम मेघवाल, काँग्रेसचे राहुल गांधी, अधिररंजन चौधरी यांच्यासह सुमारे १०० खासदार सभागृहात उपस्थित होते.

  • 8/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा हे शपथविधी सोहळय़ांसाठी रायपूर व भोपाळला गेल्याने सभागृहात नव्हते.

  • 9/9

    तब्ब्ल २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबरला २००१ साली सुद्धा संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यासाठीच काल संसद परिसरात शहिदांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली होती.(सर्व फोटो: PTI/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsलोकसभाLoksabha

Web Title: 13th december proven black day loksabha sansad attack security breach was done via bjp mp pratap simha who are 4 accused svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.