-
घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका सनदी अधिकाऱ्याचे मुलाने प्रिया सिंहच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडला असून पीडितेने समाजमाध्यमांवर या घटनेची माहिती देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
-
प्रिया सिंह ही मॉडेल, फिटनेस ट्रेनर, फॅशन प्रमोटर असून ती इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिचे १.१ मिलियन म्हणजेच ११ लाख फॉलोअर्स आहेत.
-
घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय फिटनेस ट्रेनर आणि फॅशन प्रमोटर असेलली प्रिया सिंह राहते. ती नवी मुंबई परिसरात सलुनचा व्यवसाय करते.
-
प्रिया सिंहने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
-
अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पिडीतेने केला आहे.
-
११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलावले. तिथे गेल्यानंतर तो बोलला नाही. यावरून झालेल्या वादातून त्याने शिवीगाळ व मारहाण केली.
-
तसेच अश्वजीतने त्याचा वाहन चालक सागर शेळके याला प्रिया सिंह गाडी घालण्यास सांगितले. त्यानंतर शेळकेने तिच्यावर गाडी घातली, असा आरोप प्रिया सिंहने केला आहे.
-
या धडकेत उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील हाड मोडले आहे. तसेच शरीरावर दुखापत झाली आहे, असे पिडीत प्रिया सिंहने तक्रारीत म्हटले आहे.
-
तसेच समाजमाध्यमांवरही तिने घडलेल्या हा घटनाक्रम मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. संपूर्ण शरीरावर जखमा आहेत, हातावर, पाठीवर आणि पोटात खोलवर जखमा आहेत, याचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
किमान ३-४ महिने अंथरुणाला खिळून राहीन आणि त्यानंतर अजून ६ महिने चालण्यासाठी आधार घ्यावा लागेल. मी कुटुंबातील मुख्य कमावती सदस्य आहे, अशी व्यथा तिने समाजमाध्यमांवर मांडली आहे.
-
प्रिया सिंहच्या कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
-
या गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांचे जिवीतास किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे, धमकाविणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
-
मी अश्वजीतला मागील साडे चार वर्षांपासून ओळखते. त्यादिवशी मध्यरात्री आम्ही मित्रांसोबत होतो. त्यावेळी तो मला टाळत होता. तसेच मी त्याला अडवित असताना त्याने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या अपघातात मला गंभीर दुखापत झाली आहे. मी जो घटनाक्रम दिला तो पोलीस तक्रारीत नमुद नाही. त्यामुळे मला पुन्हा माझा जबाब नोंदवायचा आहे. या प्रकरणात ३०७ कलमंतर्गत गुन्हा दाखल करायचे आहे, असे प्रिया सिंहने सांगितले.
-
आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंबंधी कारवाई करून अहवाल मागवला आहे.
Photos : विवाहित असल्याचं बिंग फुटलं, सनदी अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड याने त्याची प्रेयसी प्रिया सिंहच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर तरूणीने इन्स्टाग्रामवर सदर प्रकार उघड केला असून पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीत तिने आरोपींचा उल्लेख केला आहे. (सर्व फोटो प्रिया सिंह इन्स्टाग्राम @priyasingh_official)
Web Title: Maharashtra bureaucrats son allegedly runs over instagram influencer girlfriend after fight kvg