-
आज म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
जागोजागी रोषणाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. सेलिब्रिटींसह अनेक लोक अयोध्येला पोहोचत आहेत. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
दरम्यान, या मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वच स्तरातील जनतेने मनोभावे देणगी दिली आहे. यामध्ये सामान्य जनतेपासून बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
ही देणगी केवळ पैश्यांची नसून काही जणांनी विटा दान केल्या आहेत आहेत तर काहींनी इतर उपयोगी वस्तू दान केल्या आहेत.
-
अशा परिस्थितीत कोणकोणत्या सेलिब्रिटींनी राम मंदिरासाठी कोणती देणगी दिली आहे हे जाणून घेऊया.
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अनेकदा लोकोपयोगी कामांमध्ये सर्वांत पुढे असतो. त्याने २०२१ साली लोकांना राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. (Photo: Instagram)
-
दरम्यान, ‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठी रक्कम दान केली आहे. स्वतः अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करून मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिल्याचा खुलासा केला आहे. मात्र, किती रक्कम दिली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. (Photo: Instagram)
-
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर राम मंदिर पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी आपल्या चाहत्यांबरोबर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी आपल्या चाहत्यांना या मंदिराची एक झलक दाखवण्याचा प्रयत्न केला होता. (Photo: Instagram)
-
त्यांनी आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं, “मित्रांनो! मी तुम्हाला अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची झलक दाखवत आहे. हे विशाल मंदिर बांधताना पाहून खूप आनंद झाला. अयोध्येच्या संपूर्ण वातावरणात जय श्री रामचा जयघोष आहे.” (Photo: Instagram)
-
दरम्यान, काही बातम्यांनुसार अभिनेते अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी पैसे नव्हे तर वीट दान केली होती. (Photo: Instagram)
-
फेब्रुवारी २०२१मध्ये ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक फोटो ट्विट करत, त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देत असल्याची माहिती दिली होती. (Photo: Instagram)
-
मुकेश खन्ना यांनी आमदात अतुल भातखळकर यांच्याकडे राम मंदिराच्या उभारणीसाठी १,११,१११ रुपयांचा देणगी धनादेश सुपूर्त केला होता. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेता पवन कल्याण यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल ३० लाख रुपये देणारी स्वरूपात दिले आहेत.
-
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही राम मंदिर उभारणीसाठी मोठी देणगी दिली आहे. मात्र त्यांनी दान केलेल्या रकमेचा खुलासा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांनी देशातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहनही केले आहे. (Photo: Instagram)
-
अभिनेते मनोज जोशी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत राम मंदिर उभारणीसाठी गुप्त दान केले असल्याचे सांगितले आहे. त्यांनी लोकांनाही या पुण्य कामासाठी दान करण्याचे आवाहन केले आहे. (Photo: Instagram)
-
हिंदी मालिका विश्वातून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता गुरमीत चौधरी याने राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिल्याची माहिती मिळाली आहे. (Photo: Instagram)
-
“राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे काम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या शुभ कार्यासाठी आपणही प्रभू रामाच्या मंदिर उभारणीसाठी मदत करूया. जय श्री राम,” असे म्हणत त्याने जनतेला निधी गोळा करण्याचे आवाहन केले आहे. (Photo: Instagram)
-
दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रणिता सुभाषने ट्विट करून श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती दिली. तिने स्वतः व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. (Photo: Instagram)
Photos: ‘जय श्री राम’ म्हणत ‘या’ कलाकारांनी राम मंदिर उभारणीसाठी दिली मोठी देणगी
राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वच स्तरातील जनतेने मनोभावे देणगी दिली आहे. यामध्ये सामान्य जनतेपासून बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
Web Title: Saying jai shri ram these artists gave a huge donation for the construction of ram temple in ayodhya pvp