• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray jansanvaad rally in dharashiv district slams bjp and modi government on various issue kvg

आता लढाई ‘वाघ विरुद्ध लांडग्यांची’, उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे जनसंवाद मेळावे घेत आहेत. यासाठी त्यांनी धाराशिव जिल्ह्याचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. (सर्व फोटो – शिवसेना उबाठा एक्स अकाऊंट)

March 8, 2024 17:48 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray Jansanvaad Rally
    1/9

    गद्दारांनी केलेल्या गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या संस्कृतीला कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठी सज्ज झालेल्या जनसमुदायाच्या ताकदीची प्रचिती धाराशिव लोकसभेतील कळंब येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यात आली, असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

  • 2/9

    “ही लढाई आता… वाघ विरुद्ध लांडगे, इमानदार विरुद्ध बेईमानदार, निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे”, असे सुतोवाच उद्धव ठाकरे यांनी केले.

  • 3/9

    महाराष्ट्रातल्या भाजपच्या खासदारांनी कधीतरी मोदींसमोर संसदेत महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

  • 4/9

    उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देशातली सगळी राज्य समृद्ध झाली पाहिजेत, तरच भारतमाता की जय आपण बोलू शकतो. ह्याची जाणीव आम्हाला आहे. पण तुमच्या मनात महाराष्ट्रद्वेष का?

  • 5/9

    न्यायदानामध्येही भाजपची काळी मांजरं बसली असतील, तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 6/9

    उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही जनसंवाद मेळाव्यातून भाजपावर तोफ डागली.

  • 7/9

    माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला पदरात घेतलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते पद्मसिंह वगैरे काहीही सांगू नको, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही त्याप्रमाणे कायमच माझ्याबद्दल आपुलकी आणि आपलेपणा दाखवलात. मी हे उपकार कधीच विसरणार नाही, असे खासदार ओमराजे निंबाळकर एका सभेत म्हणाले.

  • 8/9

    धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि उबाठा गटाचे नेते कैलास पाटील यांच्या कळंब मतदारसंघातही जाहीर सभा पार पाडली. या सभेत कैलास पाटील यांनी उबाठा गटात का राहिलो? याबद्दलची भूमिका मांडली.

  • 9/9

    धाराशिव येथील तुळाजापूर शहरात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीची शपथ घेऊन पुन्हा एकदा मातोश्रीवरील बैठकीचा उल्लेख केला. त्या बैठकीत अमित शाह यांनी बंद दाराआड अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिला होता, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayभारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Uddhav thackeray jansanvaad rally in dharashiv district slams bjp and modi government on various issue kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.