-   बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ९ अपत्य आहेत. रोहिणी आचार्य ही लालूंची दुसरी कन्या. रोहिणी सोशल मीडियावर आपली रोखठोक मते व्यक्त करत असतात. तसेच आपले फोटोही शेअर करतात. 
-  रोहिणी आचार्य सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे आरजेडीने त्यांना बिहारच्या निवडणुकीत उतरवले आहे. सारण लोकसभेतून रोहिणी आचार्य राजकारणात उतरत आहेत. 
-  रोहिणी आचार्य यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले असून त्या डॉक्टर आहेत. २०२२ साली लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी स्वतःची किडनी वडिलांना दिली होती. 
-  रोहिणी आचार्य यांनी आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पाटना येथे घेतले. त्यानंतर बहीण मीसा भारती यांच्या पावलावर पाऊल टाकत जमशेदपूरच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या महाविद्यालयातून पदवी संपादन केली. 
-  रोहिणी यांच्या नावाचीही रंजक कहाणी आहे. त्यांचा जन्म १९७९ मध्ये हिंदू कॅलेंडरच्या रोहिणी नक्षत्रात पाटणास्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमला आचार्य यांच्या देखरेखीखाली झाला. तेव्हा डॉ. आचार्य यांनी लालू प्रसाद यांच्याकडून कोणतेही शुल्क घेण्यास नकार दिला. लालूंनी आग्रह धरला तेव्हा डॉ. आचार्य यांनी त्यांना विचारले की, ते त्यांच्या मुलीला त्यांचे आडनाव देऊ शकतात का? लालूंनी लगेच होकार दिला आणि आपल्या मुलीचे नाव त्यांनी रोहिणी आचार्य, असे केले. 
-  २००२ साली रोहिणी आचार्य यांचे समरेश सिंह यांच्या लग्न झाले. समरेश सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते अमेरिकेत होते. लग्नानंतर रोहिणी अनेक वर्ष सिंगापूर येथे राहत होत्या. त्यामुळेच त्यांना सिंगापूरची सूनही म्हटले जाते. 
-  नितीश कुमार यांनी आरजेडीची आघाडी तोडून पुन्हा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोहिणी आचार्य यांनी एक्स वर जहाल टीका केली होती. त्यांच्या एक्सवरील पोस्ट त्यावेळी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. 
-  सारणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी २ एप्रिलपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे. सारणचे मतदार मला नक्कीच समर्थन देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 
-  सारण या लोकसभेत सध्या भाजपाचे राजीव प्रताप रुडी हे खासदार आहेत. राजीव प्रताप रुडी भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. २०१४ आणि २०१९ साली त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला. त्याआधी लालू प्रसाद यादव याठिकाणाहून खासदार म्हणून निवडून जात होते. 
-  रोहिणी आचार्य यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात करताना बाबा हरिहरनाथ मंदिराला आई राबडीदेवी आणि वडील लालू प्रसाद यादव यांच्यासह भेट देऊन दर्शन घेतले आणि प्रचाराचे रणशिंग फुंकले. 
Photo : किडनी देऊन वडील लालू प्रसाद यादवांना वाचवलं, लोकसभा लढविणाऱ्या रोहिणी आचार्य कोण आहेत?
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. सारण या यादव कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्या भाजपाचे नेते राजीव प्रताप रुडी यांना टक्कर देणार आहेत. रोहिणी आचार्य काय करतात? त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. (सर्व फोटो – रोहिणी आचार्य यांचे फेसबुक)
Web Title: Lalu prasad daughter rohini acharya contest election from saran lok sabha seat know about her kvg