-
बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.”
-
त्यावर शरद पवार म्हणाले की, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार..
-
शरद पवारांच्या विधानानंतर अनेक महिला नेत्यांनी टीका केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, “एखादी सून ३० वर्षे, ४० वर्षे, ५० वर्षे जरी लग्न होऊन झाले असतील तरीही ती बाहेरची असते का? ती घरची होत नाही. त्यांचं हे बोलणं मला मुळीच पटलं नाही.”
-
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही शरद पवारांच्या विधानावर टीका केली. ‘सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले. महाराष्ट्रातल्या समस्त सुनांचा हा अपमान आहे, असं त्या म्हणाल्या.
-
“बाहेरून’ आलेल्या सावित्री माई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या. ‘बाहेरून’ आलेल्या येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या. अहो रमाईच्या संसारातल्या त्यागाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पुरुष घडत असतात”, अशीही टीका शीतल म्हात्रे यांनी केली.
-
शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे, अशी टीका अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
-
रुपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या, सून बाहेरची असते अशा निर्देशाचे संतापजनक वक्तव्य करून तथाकथित पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. त्यातून त्यांचेही पाय मातीचेच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
-
लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले असल्याची टीकाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.
-
शरद पवारांनी आम्हाला महिला धोरण दिलं. अनेक महिलांना काम करण्याची संधी दिली. पण त्यांनी सुनेत्रा पवारांबाबत केलेलं विधान खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिली.
-
शरद पवारांचे वक्तव्य ऐकल्यानंतर हे तेच ३० वर्षांपूर्वीचे शरद पवार आहेत का? असा प्रश्न आम्हाला पडतोय असेही त्या म्हणाल्या.
-
माहेरी वाढलेली लेक तिचं सर्वकाही सोडून लग्न झाल्यानंतर सासरी येते. तेव्हा सासरच्या माणसात एकरूप होताना ती समाजासाठीही योगदान देण्याचा प्रयत्न करते. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर, महाराणी येसूबाई… अशा अनेकांची नावे घेता येतील. ज्यांनी सासरी आल्यानंतर कर्तुत्व सिद्ध केले, असेही त्या म्हणाल्या.
Photo : “ते धृतराष्ट्र झाले”, सर्वपक्षीय महिला नेत्या शरद पवारांवर का संतापल्या?
अजित पवारांच्या भाषणाला प्रत्युत्तर देत असताना सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर राज्यभरातील विविध महिला नेत्यांनी शरद पवारांवर टीकास्र सोडले आहे. महिला धोरण राबविणाऱ्या शरद पवारांना पहिल्यांदाच अशापद्धतीने महिलांच्या टीकेला सामोरे जावे लागले. (सर्व फोटो सदर नेत्यांच्या फेसबुकवरून)
Web Title: Why all party women leaders criticized sharad pawar kvg