-
मुंबई तसेच उपनगरांत तापमान घटले असले तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव कायम आहे.
-
दरम्यान, रविवार आणि सोमवार मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
-
तसेच या कालावधीत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज देखील वर्तविला आहे.
-
मुंबईकरांना गेले काही दिवस उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा ताप कमी झाला असला तरी उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
-
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
-
दरम्यान, मुंबईत रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
-
त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
-
मुंबईत उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी काही भागात झळा कायम आहेत.
-
त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. (सर्व फोटो प्रतिकात्मक आणि ग्राफिक्सने तयार केलेले आहेत.)
Maharashtra Heatwave Warning : सावधान! मुंबईत ‘हे’ २ दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांनाही इशारा
मुंबईत रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Maharashtra and mumbai heatwave warning latest news about summer climate spl