-
बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगना रणौतने भारताच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कंगनाने हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे.
-
आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून यामध्ये कंगना यशस्वी होणार की नाही हे समजणार आहे. दरम्यान आज आपण कंगनाच्या अशा काही वक्तव्यांबाबत जाणून घेऊया ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
-
अभिनेत्री कंगना रणौत नरेंद्र मोदी यांची कट्टर समर्थक आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये तिने भारताच्या स्वातंत्र्याबाबत तिचे मत प्रकट केले होते.
-
एका कार्यक्रमात कंगना म्हणाली की भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे ‘भीक’ होती. २०२४मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले.
-
यावेळी अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. अनेकांचे असे म्हणणे होते की कंगनाने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. विशेष म्हणजे प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये भाजपचे खासदार वरुण गांधी हे होते.
-
याचवर्षी मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये द्वेषपूर्ण प्रचार आणि जातीय हिंसा भडकावल्याबद्दल कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. कंगनाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
-
पश्चिम बंगालमधील मतदानानंतरच्या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया देताना कंगनाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट टीका केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्या या कृतीमुळे तिचे ट्विटर अकाऊंट २ वर्षांसाठी बॅन करण्यात आले होते.
-
२०२० साली कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. बॉलीवूडच्या माफियांपेक्षा मुंबई पोलिसांनी तिचा जास्त छळ केल्याचे तिने सांगितले होते.
-
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना कंगनाने हे वक्तव्य केले होते. यावेळी संजय राऊत यांनी कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या प्रतिकूल टिप्पणीबद्दल तिची निंदा केली होती.
-
यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. पालिकेने कंगनाच्या मुंबईतील प्रोडक्शन हाऊसला बेकायदा बांधकामाची नोटिस बजावली आणि ते पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
-
इतकंच नाही तर, २०२० साली आणखी एका वादात कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटले होते. कंगनाने एका टीव्ही मुलाखतीदरम्यान तत्कालीन काँग्रेस नेत्या उर्मिला यांच्या विरोधात हे वक्तव्य केले होते.
-
कंगनाला तिच्या राजकीय आकांक्षांबाबत विचारले असतं तिने उत्तर दिले की तिच्या मते फक्त ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म्स’साठी ओळखल्या जाणाऱ्या उर्मिला यांना तिकीट मिळू शकते तर तिला का नाही मिळू शकत?
-
उर्मिला यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून राजकीय पदार्पण केले. यावे त्या निवडणूक हरल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन २०२० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
-
२०२०-२१ मध्ये देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे देशभरात वातावरण तापले होते. अशावेळेस कंगनाने अनेक वादग्रस्त विधाने केली होती. इतकंच नाही तर तिने शेतकऱ्यांना ‘दहशतवादी’ देखील संबोधले होते.
-
फेब्रुवारी २०२१ मध्ये, तत्कालीन ट्वीटरने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिच्या काही द्वेषयुक्त भाषणावरील पोस्ट्स काढून टाकल्या. कर्नाटकातील एका कोर्टाने कंगनाच्या शेतकरी विरोधी पोस्टबद्दल एफआयआर नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
Lok Sabha Election 2024: कंगना रणौतच्या ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात माजवली खळबळ
आज आपण कंगनाच्या अशा काही वक्तव्यांबाबत जाणून घेऊया ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
Web Title: Lok sabha election 2024 result update these controversial statements of kangana ranaut created storm in the political circle pvp