Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. smriti irani rajeev chandrasekhar ajay mishra teni among 13 union ministers who lost 2024 lok sabha polls spl

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘या’ १३ केंद्रीय मंत्र्यांचा झालाय मोठा पराभव! स्मृती इराणी, रावसाहेब दानवे पहा कोणत्या नावांचा समावेश

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही. तर दुसऱ्या बाजूला देशामधील दिग्गज नेत्यांनाही धक्कादायकरित्या या निवडणुकीतून पराभूत व्हावं लागलं आहे. यामध्ये अनेक केंद्रीय मंत्रीही आहेत.

Updated: June 6, 2024 13:30 IST
Follow Us
  • Smriti Irani
    1/13

    ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा झाली आणि सर्वत्र चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही. तर दुसऱ्या बाजूला देशामधील दिग्गज नेत्यांनाही धक्कादायकरित्या या निवडणुकीतून पराभूत व्हावं लागलं आहे. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊ.
    भाजपच्या खासदार राहिलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. त्या २०१९ मध्ये राहुल गांधी यांना पराभूत करून बालविकास मंत्री म्हणून केंद्रात काम करत होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये १ लाख ६७ हजार १९६ मतांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा हे अमेठी मतदारसंघात ठिकाणी विजयी झाले आहेत. (PTI)

  • 2/13

    केरळच्या तिरुवनंतपुरम मतदार संघात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव शेखर यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांनी त्यांना १६ हजार ७७ मतांनी पराभूत केले आहे. (File/Express Photo by Amit Mehra)

  • 3/13

    केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचाही पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाच्या उत्कर्ष वर्मा यांनी त्यांचा ३४ हजार ३२९ मतांनी पराभव केला आहे. टेनी यांच्या मुलाला २०२१ मध्ये लखीमपुर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती.(PTI)

  • 4/13

    झारखंड मधील खुंटी या मतदारसंघात केंद्रीय मंत्री खासदार अर्जुन मुंडा यांचा पराभव काँग्रेस उमेदवार कालीचरण मुंडा यांनी केला आहे. १ लाख ४९ हजार ७७५ मतांनी त्यांचा पराभव झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. (File/Express Photo by Prem Nath Pandey)

  • 5/13

    महाराष्ट्रातील जालना मतदारसंघांमध्ये केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाण मंत्री भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पराभूत केले आहे. कल्याण काळे यांना १ लाख ९५८ मतांचे मताधिक्य मिळाले. (File/ Express Photo by Deepak Joshi)

  • 6/13

    केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचा उत्तर प्रदेशातील चंदोली मतदारसंघात पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाच्या विरेंद्र सिंह यांच्याकडून २१हजार ५६५ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला आहे. (Facebook/ Dr Mahendra Nath Pandey)

  • 7/13

    पश्चिम बंगालच्या बांकुरा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांचा तृणमूलच्या उमेदवाराने पराभव केला आहे. अरुप चक्रवर्ती यांनी ३२ हजार ७७८ मतांनी सुभाष सरकार यांच्या विरोधात विजय प्राप्त केला आहे. (Facebook/ Dr Subas Sarkar)

  • 8/13

    केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांचा राजस्थानमधील बारमेर या मतदार संघात पराजय झाला आहे. बारमेर या ठिकाणी उमेदाराम बेनिवाल यांचा ४ लाख १७ हजार ९४३ इतक्या मताधिक्याने विजय झाला आहे. (File/Express Photo by Anil Sharma)

  • 9/13

    उत्तर बंगालमधील भाजपाचा युवा चेहरा केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि युवक तसेच क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांना कुचबिहार मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. तृणमूलच्या जगदीश चंद्र बसुनिया यांनी त्यांना ३९ हजार २५० मतांनी पराभूत केले आहे. (File/ Express Photo by Amit Mehra)

  • 10/13

    केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांचा तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या ए राजा यांनी पराभाव केला आहे. २ लाख ४० हजार ५८५ मताधिक्क्याने मुरुगन यांचा पराभव झाला आहे. (Facebook/ L Murugan)

  • 11/13

    केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांचा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या हरेंद्र सिंह मलिक यांच्याकडून २४ हजार ६७२ मतांनी पराभव झाला आहे. (File/Express Photo by Partha Paul)

  • 12/13

    महाराष्ट्रातील भिवंडी मतदारसंघात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे (शरदचंद्र पवार) यांच्याकडून ६६ हजार १२१ मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. (Facebook/ Kapil Patil)

  • 13/13

    केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री भारती पवार यांचा महाराष्ट्रातील दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) भास्कर भगरे यांच्याकडून ५ लाख ७७ हजार ३३९ मतांनी पराभव झाला. (Facebook/ Dr Bharti Pawar) हे देखील पहा- मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा ते एनडीएची बैठक: घटकपक्ष बनले राजकारणाचा केंद्रबिंदू;…

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Smriti irani rajeev chandrasekhar ajay mishra teni among 13 union ministers who lost 2024 lok sabha polls spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.