Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. lok sabha election nda kingmaker chandrababu naidu property net worth and assets here invested rs 763 crore spl

चंद्राबाबू नायडू आहेत अफाट संपत्तीचे मालक; शेअर बाजारातील ‘या’ कंपनीत तब्बल ७६३ कोटी रुपयांची गुंतवणूक!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांची भूमिका निर्णायक ठरेल अशी स्थिती तयार झाली आहे. चंद्राबाबू आंध्रप्रदेश राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, देशातील सर्वात श्रीमंत पुढाऱ्यांपैकी नायडू देखील एक आहेत.

Updated: June 6, 2024 21:49 IST
Follow Us
  • Lok Sabha Election 2024 Chandrababu Naidu
    1/9

    यंदा लोकसभा निवडणूक झाली आणि निकाल जाहीर झाले. याखेपेला एनडीए आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. एनडीएच्या पक्षांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. आंध्रप्रदेशमध्ये भाजपा आणि नायडू यांच्या तेलगू देसम या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. टीडीपीने एकूण १६ जागांवर विजय मिळवून एनडीए आघाडीतील भाजपानंतर सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष अशी ओळख मिळवली आहे. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 2/9

    निकाल जाहीर झाल्यांनतर चंद्राबाबू नायडू यांची भूमिका मोदी सरकारसाठी निर्णायक ठरणार आहे. चंद्राबाबू हे तीन वेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत, आता ते चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 3/9

    देशातील सर्वात श्रीमंत पुढाऱ्यांपैकी नायडू देखील एक आहेत. नायडू किती श्रीमंत आहेत हे आपण जाणून घेऊयात. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 4/9

    निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत चंद्राबाबू यांनी त्यांच्या संपत्तीचा गोषवारा दिला आहे. आयोगाच्या माहितीनुसार चंद्राबाबू यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचाही समावेश आहे. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 5/9

    चंद्राबाबू नायडू यांच्याकडे २०१९ साली ६६८ कोटी रुपयांची संपत्ती होती. आता २०२४ मध्ये ती वाढून ९३१ कोटी रुपये इतकी झाली आहे. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 6/9

    नायडू आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर विविध बँक खात्यांमध्ये १३ कोटी रुपये जमा आहेत. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 7/9

    मोठ्या कंपनी, विविध व्यवसाय, आणि शेअर बाजारात चंद्रबाबू यांनी गुंतवणूक केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार नायडूंच्या संपत्तीमधील इतकी मोठी वाढ ही शेअर बाजारातील नफ्यामुळे झाली आहे. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 8/9

    नायडू यांनी त्यांच्या नावे ‘हेरिटेज फूड्स लिमिटेड’चे २ कोटी २६ लाख ११ हजार ५२५ शेअर्स खरेदी केले आहेत. सध्या या शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम ७६३ कोटी रुपये इतकी होते. (फोटो-@Nara Chandrababu Naidu)

  • 9/9

    चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्याकडे ३ कोटी रुपयांचे सोन्या – चांदी आणि हिऱ्याचे दागिने आहेत. दोघांच्या नावावर मिळून १२१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये शेतजमीन, एनए प्लॉट्स, रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. (फोटो-@Nara Chandrababu Naidu) हेदेखील पहा- PHOTOS : बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत! उत्साही समर्थकांन…

TOPICS
चंद्राबाबू नायडूChandrababu Naiduनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Lok sabha election nda kingmaker chandrababu naidu property net worth and assets here invested rs 763 crore spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.