• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi president and mps salary and other benefits jshd import pvp

भारतात पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना मिळतो तब्बल ‘इतका’ पगार; जाणून घ्या आणखी कोणकोणत्या सुविधा मिळतात

भारतातील पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांचा पगार किती आहे हे जाणून घेऊया.

June 11, 2024 12:20 IST
Follow Us
  • President's Salary
    1/9

    सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे भारतातील दुसरे नेते ठरले आहेत. देशाचे पहिले नेते जवाहरलाल नेहरू होते जे तीन वेळा पंतप्रधान झाले. अशा परिस्थितीत, भारतातील पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांचा पगार किती आहे आणि कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे जाणून घेऊया. (पीटीआय)

  • 2/9

    मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिन्याला १.६६ लाख रुपये पगार मिळतो. यामध्ये मूळ वेतन ५० हजार रुपये, खर्च भत्ता ३ हजार रुपये, संसदीय भत्ता ४५ हजार रुपये आणि दैनिक भत्ता २ हजार रुपये आहे.

  • 3/9

    नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून ज्या सुविधा मिळतात त्याबद्दल सांगायचे तर त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान, एसपीजी सुरक्षा, सरकारी वाहने आणि एअर इंडिया वनचे विशेष विमान यासारख्या सुविधा मिळतात.

  • 4/9

    पंतप्रधान मोदी मर्सिडीज-बेंझ S650 कारमधून प्रवास करतात. ही कार पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे ज्यावर AK-47 सारख्या रायफलचाही प्रभाव पडत नाही.

  • 5/9

    देशाच्या राष्ट्रपतींच्या मासिक पगाराबद्दल बोलायचे तर त्यांना पाच लाख रुपये पगार मिळतो. २०१८ पर्यंत राष्ट्रपतींचा पगार दीड लाख रुपये होता.

  • 6/9

    त्याचबरोबर देशाच्या उपराष्ट्रपतींना दरमहा ४ लाख रुपये पगार मिळतो. २०१८ पर्यंत उपराष्ट्रपतींचे वेतन १.२५ लाख रुपये होते.

  • 7/9

    खासदाराच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्याला दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय दैनिक भत्ताही मिळतो.

  • 8/9

    यासोबतच कोणत्याही खासदाराला संसदेची अधिवेशने आणि समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज २००० रुपये आणि रस्ता प्रवास भत्ता १६ रुपये प्रति किलोमीटर मिळतो.

  • 9/9

    खासदारांना दरमहा ४५-४५ हजार रुपये मतदारसंघ भत्ता आणि स्टेशनरी आणि टपालासाठी १५ हजार रुपये कार्यालयीन खर्चाचा भत्ता मिळतो. पगाराव्यतिरिक्त खासदारांना अनेक सुविधाही मिळतात.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Prime minister narendra modi president and mps salary and other benefits jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.