Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. opposition on pm narendra modi s red fort speech jayram ramesh manoj jha d raja spl

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणावर विरोधकांची टीका; घटनाकारांचा अपमान झाल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप!

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील काही मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून पंतप्रधान त्यांचा विभाजनाचा अजेंडा राबवत असल्याची टीका करण्यात आली आहे.

Updated: August 16, 2024 13:08 IST
Follow Us
  • pm modi seepch at red fort
    1/10

    काल देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Photo: PTI)

  • 2/10

    दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही तिरंगा फडकावला. (Photo: PTI)

  • 3/10

    सलग अकराव्यांदा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर भाषण केले आहे. (Photo: PTI)

  • 4/10

    पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (Photo: PTI)

  • 5/10

    स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील काही मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून पंतप्रधान त्यांचा विभाजनाचा अजेंडा राबवत असल्याची टीका करण्यात आली आहे. (Photo: PTI)

  • 6/10

    पंतप्रधानांनी सांप्रदायिक नागरी कायद्या’ चा उल्लेख करून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला. (Photo: PTI)

  • 7/10

    “आतापर्यंत आपल्याकडे ‘सांप्रदायिक नागरी कायदे’ होते असे म्हणणे म्हणजे डॉ. आंबेडकरांचा घोर अपमान आहे. १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत प्रत्यक्षात आलेल्या हिंदू वैयक्तिक कायद्यांमधील सुधारणांचे सर्वात मोठे श्रेय डॉ. आंबेडकरांना जाते, या कायद्यांना त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाने कडवा विरोध केला होता,” असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 8/10

    भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशासमोर जनतेला एकत्र आणण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. ते जे काही बोलले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्ट, फुटीरतावादी अजेंड्याशी सुसंगत आहे.” (Photo: Express photo by Ravi Kanojia/File)

  • 9/10

    राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते मनोज झा म्हणाले की, “देशात एकच पंतप्रधान आहे आणि ज्यांनी विरोधकांना मतदान केले, त्यांच्याकडे वेगळा पंतप्रधान नाही हे मोदींना अजून कळलेले नाही. सलग ११ व्या वर्षी पंतप्रधान होऊनही मोदींना हे समजण्यात अपयश आले आहे. त्यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण राजकीय होते. आज ते धर्मनिरपेक्ष नागरी संहितेबद्दल बोलले. धर्मनिरपेक्षता ही एक प्रक्रिया आहे, ती आत्मसात केली पाहिजे.” (Photo: ANI)

  • 10/10

    (Photo: PTI) हे देखील वाचा: Pm Modi Independence Day Speech : लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदी ‘कोलकाता बलात्कार-हत्या’ प्रकरणावर काय म्हणाले? वाचा ठळक १० मुद्दे

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congressमराठी बातम्याMarathi Newsस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Opposition on pm narendra modi s red fort speech jayram ramesh manoj jha d raja spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.