-
कुख्यात दाऊदशी व्यवहार केल्याच्या आरोपांवरून ‘ईडी’ने अटक केलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या महायुतीमधील समावेशास भाजपने आक्षेप घेतला असला तरी मलिक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत विशेष महत्त्वाचे स्थान देण्यात आले.
-
तसेच मलिक यांच्या कन्येची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
-
तसेच मलिक यांच्या कन्येची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
-
त्याच वेळी वांद्रे पूर्वमधील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी हे अजित पवारांच्या यात्रेत सहभागी झाले होते.
-
नवाब मलिक यांना महायुतीत प्रवेश देण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे आक्षेप घेतला होता. तसे पत्र त्यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अजित पवार यांना पाठविले होते.
-
असे असले तरी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळी मानखुर्द आणि अणुशक्तीनगर भागांमध्ये नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर व्यासपीठावर एकत्र होते.
-
तसेच अणुशक्तीनगर येथे अजित पवारांच्या यात्रेच्या स्वागताला मलिक हे उपस्थित होते.
-
नवाब मलिक यांच्याबाबत आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
-
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा आक्षेप असणार हे गृहित धरूनच अजित पवारांनी अणुशक्तीनगर भागात झालेल्या जाहीर सभेत मलिक यांची कन्या सना मलिक-शेख यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली. सना यांना बहुधा विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (All Photos : Ar Sana Malik-Shaikh facebook page)
Nawab Malik : नवाब मलिक अजित पवारांच्या यात्रेत सहभागी; मुलीची प्रवक्तेपदी निवड, पाहा फोटो
Nawab Malik, Sana Malik : सना मलिक यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Web Title: Nawab malik joins ajit pawars jansanwad yatra daughter sana appointed as party spokesperson latest news spl