-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने एका इव्हेंटमध्ये जबरदस्त गोल्डन गाऊन परिधान केला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
जॅकलीनने परिधान केलेल्या गोल्डन गाऊनमध्ये फुलांची एम्ब्रॉइडरी आणि शिमरी डिटेल्स होते ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत होती.
-
गाऊनचे फिटिंगही इतके उत्कृष्ट होते की ते जॅकलिनच्या सुंदर फिगरला उत्तम प्रकारे हायलाइट करत होते. सोनेरी रंगाने तिच्या लूकला बहर आणला. यामध्ये ती रॉयल दिसत होती.
-
जॅकलिनने या गाऊनसोबत स्ट्रॅपी हील्स घातली होती, जी तिच्या आउटफिटशी अगदी जुळते. या हील्स तिच्या संपूर्ण लूकला स्टायलिश टच देत होत्या.
-
याशिवाय तिने काही फोटोंमध्ये तिच्या हातात सोन्याची पर्स घेतली आहे आणि काही फोटोंमध्ये तिने सोनेरी रंगाचा क्लच धरला आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच खास बनला आहे.
-
जॅकलिनची हेअरस्टाईल तिचा लूक आणखीनच खुलवंत होती. तिने तिचे केस स्लीक आणि स्ट्रेट ठेवले, जे तिच्या ग्लॅमरस पोशाखाशी पूर्णपणे मॅच झाले.
-
मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तर तिने हलका मेकअप केला होता, ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलत होते. न्यूड लिपस्टिक आणि सॉफ्ट आय मेकअप तिच्या संपूर्ण लुकला सुरेख बनवत होते.
-
(Photos Source: @jacquelienefernandez/instagram)
Photos : गोल्डन गाऊनमधील जॅकलिन फर्नांडिसचा रॉयल लूक व्हायरल, चमकदार सौंदर्यावर चाहते घायाळ
Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच फॅशनमध्ये नवीन ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने एका इव्हेंटमध्ये गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसत होती.
Web Title: Jacqueline fernandez glitters in gold sequin gown spl