• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. how many times kangana ranaut has given controversial statements spl

Kangana Ranut : कंगना रणौत यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेली ‘ही’ वक्तव्यं ठरली वादग्रस्त!

How Many times Kangana Ranaut has given controversial statements on Farmers Laws: कंगना रणौत यांनी शेतकऱ्यांबद्दल किती वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत? ते जाणून घेऊया.

Updated: September 25, 2024 15:40 IST
Follow Us
  • Kangana Ranaut controversial statements on Farmers
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कंगना रणौत यांनी मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, याबाबत आता एका व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेत्रीने माफी मागितली असून आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले आहे. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 2/9

    गेल्या महिन्यात त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या एका विधानानंतर पक्ष त्यांच्यापासून दुरावला असल्याची चर्चा होत होती. दरम्यान, कंगना रणौत यांनी किती वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत ते जाणून घेऊया. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 3/9

    १- पैसे घेऊन आंदोलन केल्याचा आरोप
    २०२० मधील शेतकरी आंदोलनाचा भाग असलेल्या वृद्ध महिलांबाबत कंगना रणौत यांनी एक फोटो ट्विट करून प्रत्येकी १०० रुपये घेऊन हे आंदोलन करत असल्याचा आरोप केला होता. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 4/9

    २- खलिस्तानी दहशतवादी म्हणण्यावरून गदारोळ झाला होता
    कंगना रणौत यानी शेतकरी आंदोलनात सहभागी असलेले काही लोक खलिस्तानी दहशतवादी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर शीख समाजात संतापाची लाट उसळली होती. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या.

  • 5/9

    ३- शेतकरी आंदोलनाला दहशतवाद म्हटले होते
    कंगना रणौत यांनी पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यावरही जोरदार टीका केली होती. वास्तविक दोघींनीही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. कंगना रणौत यानी हा भारताला बदनाम करण्याच्या कटाचा भाग असल्याचे म्हटले होते आणि त्याचवेळी त्यांनी रिहानाला मूर्ख आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहशतवाद म्हटले होते. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 6/9

    ४- कृषी कायदे मागे घेणे दुर्दैवी म्हटले होते
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा कंगना यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर आरोप करताना शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष केल्याची टीका कंगणा यांनी केली होती. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 7/9

    ५- भारतात बांगलादेश…
    गेल्या महिन्यात कंगना रणौत यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती. या वक्तव्यानंतर भाजपानेही त्यांच्यापासून दुरावा साधला. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याची तयारी असल्याचे या अभिनेत्रीने म्हटले होते. शेतकऱ्यांचे असेच नियोजन होते, जसे बांगलादेशात घडले, तसेच भारतात षडयंत्र रचले जात होते असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान भाजपाने त्यांचे वक्तव्य फेटाळून लावत हे पक्षाचे मत नसल्याचे म्हटले होते. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 8/9

    ६- कानशिलात लगावली
    शेतकऱ्यांबद्दल अशी वादग्रस्त विधाने केल्याबद्दल कंगना रणौतला कानशिलात लगावली गेली आहे. या वर्षी जून महिन्यात ती चंदीगड विमानतळावर चेक इन करत असताना एका CISF महिला कॉन्स्टेबलने तिला जोरदार चापट मारली. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांनी पैसे घेतल्याचा आरोप कंगना रणौत यांनी केल्याने महिला कॉन्स्टेबलला कंगना यांच्यावर खूप राग होता. कारण तिच्या आईचाही शेतकरी आंदोलनात सहभाग होता. (Photo: Kangana Ranaut/Insta)

  • 9/9

    हेही वाचा- डेनिम मिडी ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचं खास फोटोशूट, पाहा Photos…

TOPICS
कंगना रणौतKangana Ranautभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsशेतकरीFarmersशेतकरी संघटनाShetkari Sanghatana

Web Title: How many times kangana ranaut has given controversial statements spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.