Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is milind deora shivsena candidate from worli constituency maharashtra assembly election 2024 spl

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

Who is Milind Deora : देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे.

Updated: October 28, 2024 11:50 IST
Follow Us
  • milind deora worli candidate
    1/9

    who is milind deora: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस होताना दिसत आहे. राज्यात दोन मुख्य आघाड्या महायुती आणि महाविकास आघाडी या आहेतच, याशिवाय अनेक छोट्या पक्षांच्या आघाड्या तयार झाल्या आहेत. ज्यामध्ये परिवर्तन आघाडी आहे, जरांगे पाटील यांची भूमिकाही महत्वाची आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी देखील आहे. त्यामुळे यंदा निवडणूक निकालांकडे जास्त लक्ष असणार आहे.

  • 2/9

    राज्यात लक्षवेधी लढतीही पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेली वरळी येथील लढत आहे. वरळीमध्ये यंदा तिरंगी सामना पाहायला मिळत आहे.

  • 3/9

    नुकतीच शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना वरळीतील उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय मनसेने संदीप देशपांडे यांना येथून उमेदवारी दिली आहे, दरम्यान, कोण आहेत मिलिंद देवरा याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • 4/9

    मिलिद देवरा यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंबईच्या दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

  • 5/9

     त्यानंतर, त्यांनी २००९ मध्ये पुन्हा निवडणूक लढवून यश मिळवले. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी अनेक सामाजिक आणि विकासात्मक योजनांची अंमलबजावणी केली आहे. ते महाराष्ट्रातील मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करणारे एक प्रमुख नेते आहेत.

  • 6/9

    देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.

  • 7/9

    जानेवारी २०२४ मध्ये मिलिद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभा मिळाली होती. असे असले तरीही त्यांना आता पक्षाने विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरवले आहे.

  • 8/9

    देवरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.

  • 9/9

    त्यामुळे वरळीतील लढत आता लक्षवेधी बनली आहे, आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे अशा या तिरंगी लढतीत वरळीकर कोणाला साथ देणार ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो साभार – मिलिंद देवरा सोशल मीडिया)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeमराठी बातम्याMarathi Newsमिलिंद देवराशिवसेनाShiv Sena

Web Title: Who is milind deora shivsena candidate from worli constituency maharashtra assembly election 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.