-
सध्या राज्यामध्ये एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
-
इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ अशी कारणं यामागे दिली जात आहेत.
-
राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीनंतर राज्याभरात विविध प्रतिक्रिया येत आहेत.
-
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. ही दरवाढ २५ जानेवारीपासून लागू झाली. मात्र, या दरवाढीची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसली आहे.
-
विरोधकांची टीका
“महामंडळातील दोन हजार कोटी रुपयांचा होणारा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. -
ठाकरे गट आक्रमक
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय राज्यात इतर ठिकाणीही हे आंदोलन केले जाईल. -
दरम्यान, सत्ताधारी मंत्र्यांनी मात्र या दरवाढीचे समर्थन केले आहे. “चांगल्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे. महामंडळ कसे चांगले चालेल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी भाडेवाढीचे सर्मथन केले आहे.
-
“एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाडीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागेल”, असं मत शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
सरकार एसटी दरवाढीवर ठाम, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…
एसटी भाडेवाढीवरुन सध्या राजकारण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे, नुकतेच शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही यावर त्यांच मत व्यक्त केलं आहे.
Web Title: St bus fare minister gulabrao patil supported bus price hike spl