-
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
-
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन काळात कविता, गाणी लिहिण्याचा छंद होता, असे सांगितलं. तसेच अमृता फडणवीस यांनी मी लिहिलेलं एक गाणं गायलं असल्याचं सांगितलं.
-
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी एक गाणं लिहिलेलं आहे. पण त्याचं श्रेय घेतललं नाही. अमृता फडणवीस यांनी ते गाणं गायलं असून यूट्यूबवर उपलब्ध आहे.
-
फडणवीस पुढं असंही म्हणाले की, ते गाणं कोणतं हे मी सांगणार नाही, तुम्ही ते शोधून काढा.
-
तसेच पत्नी अमृता फडणवीस यांच्यासाठी कोणतं गाणं डेडिकेट कराल, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी महाविद्यालयीन काळातील एक गाणं डेडिकेट केलं.
-
आमचा प्रेमविवाह नाही. आम्ही अरेंज मॅरेज केलं आहे. नाईन्टीज गाणी मला खूप आवडतात. त्यातलंच “राहो उनसे मुलाकात हो गई…”, हे गाणं आम्हाला आवडतं. तसेच अनेक गाणी आहेत. हे गाणं डेडिकेट करू, असे फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नुकतेच मी राम जन्मभूमीच्या सोहळ्यानंतर प्रभू रामावर गाणं लिहिलं आहे. भगवान शंकरावर गाणं लिहिलं आहे. शंकर महादेवन यांनी ते गायलं आहे.
-
गाणं लिहिण्याच्या आणि भाषणात शेरोशायरी करण्याच्या छंदाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. हे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
-
यावेळी त्यांनी महाविद्यालयीन काळात लिहिलेली एक कविताही ऐकवली. “तुम्ही म्हणता, माझ्या कवितेला अर्थ नसतो. नसेनाका अर्थ, अनर्थ तरी असतो…”, अशी कविता देवेंद्र फडणवीस यांनी कविता ऐकवली.
“जिस से डरते..”, पत्नी अमृता फडणवीसांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी डेडिकेट केलं ‘हे’ गाणं
Devendra Fadnvais: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासाठी गाणं लिहिलं असल्याची आठवण सांगितली.
Web Title: Cm devendra fadnavis dedicate 90s song to wife amruta fadnavis kvg