• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. fastag annual pass at rs 3000 how to activate process validity aam

तीन हजार रुपयांचा वार्षिक FASTag पास कसा काढायचा? दोन वाहनांसाठी एकच पास चालतो का? काय आहेत नियम

Annual Fastag Pass Information: रस्ते व महामार्ग मंत्रालयाने, जाहीर केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की पासचे शुल्क दरवर्षी बदलले जाऊ शकते. यामध्ये दरवर्षी १ एप्रिलपासून बदल लागू केले जातील.

June 23, 2025 13:14 IST
Follow Us
  • Fastag Annual Pass
    1/9

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन वार्षिक फास्टॅग योजना जाहीर केली आहे. यामध्ये वाहनधारकांना तीन हजार रुपयांत वार्षिक फास्टॅग पास मिळणार आहे.

  • 2/9

    या पासद्वारे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० फेऱ्यांपर्यंत कोणताही टोल भरावा लागणार नाही. या योजनेचा लाभ फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी गैर-व्यावसायिक वाहनांना मिळणार आहे.

  • 3/9

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला आहे की, या पासमुळे वाहनधारकांचे या पासमुळे किमान ७ हजार रुपये वाचणार आहेत. तसेच, टोल प्लाझावरून जाण्याचा सरासरी खर्च फक्त १५ रुपयांवर येईल.

  • 4/9

    दरम्यान, ही नवीन फास्टॅग वार्षिक योजना कोणत्याही वाहनधारकासाठी बंधनकारक नाही. ही फक्त एक पर्यायी योजना आहे, ज्यामुळे टोलवरील समस्या टाळण्यासाठी मदत होणार आहे.

  • 5/9

    वार्षिक फास्टॅग पासची किंमत किमान ३,००० रुपये आहे. याद्वारे वाहनधारकांना वर्षभर किंवा दोनशे फेऱ्यांपर्यंत टोल न भरता प्रवास करता येणार आहे.

  • 6/9

    हा पास फास्टॅग नोंदणीकृत असलेल्या विशिष्ट वाहनाशी जोडलेला असेल, त्यामुळे तो दुसऱ्या वाहनासाठी हस्तांतरित केला जाऊ शकणार नाही.

  • 7/9

    रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, पासचे शुल्क दरवर्षी बदलले जाऊ शकते. हे बदल दरवर्षी १ एप्रिलपासून लागू होतील.

  • 8/9

    वाहनाची पात्रता आणि त्याच्याशी जोडलेल्या फास्टॅगची पडताळणी केल्यानंतरच नवीन वार्षिक पास मंजूर केला जाईल. पास मंजूर झाल्यानंतर, वाहनधारकाला ‘राजमार्ग यात्रा’ मोबाइल अ‍ॅप किंवा एनएचएआयच्या वेबसाइटद्वारे वर्ष २०२५-२०२६ साठी ३,००० रुपये भरून पास खरेदी करता येईल.

  • 9/9

    ३ हजार रुपये शुल्क भरल्यानंतर, नोंदणीकृत फास्टॅगवर वार्षिक पास अ‍ॅक्टिव्हेट केला जाईल आणि वाहनधारकाला पासबद्दल एसएमएस अपडेट्स मिळतील. (सर्व फोटो सौजन्य: पीटीआय)

TOPICS
कारCarदुचाकीTwo Wheelerनितीन गडकरीNitin Gadkariमुंबई गोवा महामार्गMumbai Goa Highwayराष्ट्रीय महामार्गNational Highwaysसमृद्धी महामार्गSamruddhi Mahamarg

Web Title: Fastag annual pass at rs 3000 how to activate process validity aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.