-
मुंबईतील आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
मुंबईतील आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीचे नेतेही होते. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपला आवाज कुणी बंद करु शकत नाही. एकजुटीने राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत. शिवसेना पूर्ण ताकदीने शिक्षकांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
आपण सर्वांनी मिळून भाजपला करंट दिला पाहिजे. तसेच यांना धडा शिकवू ते पुन्हा वळवळ करण्यास शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
याच ठिकाणी गिरणी कामगारांचे आंदोलनही सुरू होते. तिथेही ठाकरेंनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
गिरणी कामगारांच्या मागण्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी ठाकरेंनी स्पष्ट केले, ते म्हणाले “गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये रक्त सांडलं नसतं तर या राज्यकर्त्यांना सांगतो की तुमच्या बुडाखाली असणारी खुर्ची तुम्हाला मिळाली नसती.” (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील)
-
शिक्षक आंदोलनात शरद पवारांचा सहभाग
मुंबईतील आझाद मैदानावर पूर्ण वेतनाच्या हक्कांसाठी आणि अन्य मागण्यांसाठी शिक्षक ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ७० हजार शिक्षक सहभागी झाले आहेत. या आंदोलनात शरद पवारही सकाळी सहभागी झाले होते. तर, रोहित पवार हे कालपासूनच आंदोलनात सहभागी झाले आहेत. (एक्सप्रेस फोटो – आकाश पाटील) हेही पाहा- “मी दिल्लीमध्ये फक्त २-३ दिवसच राहतो” नितीन गडकरी असे का म्हणाले?
Photos: शिक्षक व गिरणी कामगारांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरेंची मविआ नेत्यांसह हजेरी; शरद पवारांनीही लावलेली उपस्थिती…
गिरणी कामगारांच्या मागण्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी ठाकरेंनी स्पष्ट केले, ते म्हणाले…
Web Title: Mill workers protest at azad maidan uddhav thackeray aaditya thackeray join the protest with mva leaders in support see photos spl