• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who shot video manikrao kokate playing online rummy on mobile in assembly session asc

रमीच्या डावाचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? जवळच्या माणसावर संशय? माणिकराव कोकाटे म्हणाले…

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली आहे.

July 22, 2025 12:17 IST
Follow Us
  • Manikrao Kokate Remark on Playing Rummy in Assembly Session
    1/9

    Manikrao Kokate Remark on Playing Rummy in Assembly Session : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहातील त्यांच्या बाकावर बसून मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (PC : Manikrao Kokate/FB)

  • 2/9

    या व्हिडीओवर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं असून “मला रमी खेळता येत नाही, मी सभागृहात रमी खेळत नव्हतो”, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली आहे. (PC : Manikrao Kokate/FB)

  • 3/9

    दरम्यान, कोकाटे यांचा व्हिडीओ कोणी चित्रीत व व्हायरल केला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर कोकाटे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (PC : Manikrao Kokate/FB)

  • 4/9

    कोकाटे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं. (PC : Loksatta)

  • 5/9

    या पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आलं की हा व्हिडीओ कसा समोर आला? तुमच्या जवळ्याच कोणीतरी त्या घटनेचं चित्रण केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यावर कोकाटे म्हणाले, “तो व्हिडीओ कोणी चित्रीत केला याच्या खोलात जायची आवश्यकता नाही. सभापती महोदय त्याची चौकशी करतील.” (PC : Loksatta

  • 6/9

    माणिकराव कोकाटे म्हणाले, “मुळात त्या व्हिडीओत काही विशेष नव्हतं. कृषीमंत्र्यानी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा दावा केला जात आहे, जे चुकीचं आहे.” (PC : Loksatta)

  • 7/9

    मी काहीच चुकीचं केलं नाही : कृषीमंत्री
    कृषीमंत्री म्हणाले, “मी काही वेडंवाकडं केलेलं नाही. उलट मी या माहाराष्ट्रात शेतकऱ्यांसदर्भात खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.” (PC : Manikrao Kokate/FB)

  • 8/9

    या प्रकरणाची चौकशी व्हावी : कोकाटे
    “मी केलेल्या कामांबद्दल कोणी काहीच बोलत नाही. ज्याच्या शेतकऱ्यांशी काहीच संबंध नाही ती गोष्टी प्रसारमाध्यमं दाखवत आहेत. त्यामुळे या प्रकरणात जे लोक दोषी असतील त्या सर्वांची एकदा चौकशी होऊन जाऊ द्या. कारण प्रसारमाध्यमं सतत तेच दाखवत आहेत.” (PC : Manikrao Kokate/FB)

  • 9/9

    माणिकराव कोकाटे म्हणाले, “कथित यासंदर्भात चौकशी करावी. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींना यासंदर्भात पत्र पाठवणार आहे. त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चोकशी करण्याची मागणी करणार आहे.” (PC : Manikrao Kokate/FB)

TOPICS
अजित पवारAjit Pawarमाणिकराव कोकाटेManikrao Kokateविधिमंडळ अधिवेशनAssembly Session

Web Title: Who shot video manikrao kokate playing online rummy on mobile in assembly session asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.