• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. narendra modi 6 unbreakable records as prime minister of india 2nd longest serving pm asc

पंतप्रधान म्हणून ४,०७८ दिवस, नरेंद्र मोदींच्या नावे सहा मोठे विक्रम

नरेंद्र मोदी यांनी राज्य व केंद्रातील कारभार मिळून २४ वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व केलं आहे.

July 25, 2025 18:09 IST
Follow Us
  • PM Narendra Modi
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२५ जुलै) माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा एक मोठा स्वतःच्या नावे केला आहे. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधान भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत. (PC : PM Narendra Modi/FB)

  • 2/10

    १. मोदी यांनी आज (शुक्रवार, २५ जुलै २०२५) भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग हे पद भूषवण्याच्या बाबतीत त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकलं आहे. (PC : PM Narendra Modi/FB)

  • 3/10

    २. मोदी यांनी राज्य व केंद्रातील कारभार मिळून २४ वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व केलं आहे. हा देखील आजवरच्या सर्व पंतप्रधानांमधील मोठा विक्रम आहे.(PC : PM Narendra Modi/FB)

  • 4/10

    इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असे सलग ४,०७७ दिवस (११ वर्षे ५९ दिवस) भारताच्या पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. तर, मोदी २६ मे २०१४ पासून या पदावर आहेत. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४,०७८ दिवस (११ वर्षे ६० दिवस) पूर्ण केले आहेत. (PC : PM Narendra Modi/FB)

  • 5/10

    ३. नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले व एकमेव पंतप्रधान आहेत. (PC : PTI)

  • 6/10

    ४. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवणारे बिगर-काँग्रेसी नेते आहेत. (PC : PM Narendra Modi/FB)

  • 7/10

    ५. मोदी हे आजवरचे भारतातील सर्व पंतप्रधान व वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. (PC : TIEPL)

  • 8/10

    ६. मोदी हे सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवणारे बिगर-हिंदी भाषिक नेते आहेत. (PC : PM Narendra Modi/FB)

  • 9/10

    मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २००२, २००७ व २०१२ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपा विजयी झाली होती. तसेच मोदींच्य नेतृत्वात भाजपाने २०१४, २०१९, २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपा विजयी झाली आहे.(PC : PM Narendra Modi/FB)

  • 10/10

    सलग सर्वाधिक काळ भारताचं पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग ६,१२६ दिवस (१६ वर्षे २८६ दिवस) भारताचं नेतृत्त्व केलं आहे. मोदी यांना नेहरुंचा हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २०४८ दिवस भारताचं नेतृत्त्व करावं लागेल. (PC : PM Narendra Modi/FB)

TOPICS
इंदिरा गांधीIndira Gandhiनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Narendra modi 6 unbreakable records as prime minister of india 2nd longest serving pm asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.