-
‘रेड सॉईल स्टोरीज’ (Red Soil Stories) या युट्यूबवरील चॅनेलचे संस्थापक शिरीष गवसचे (Shirish Gavas) वयाच्या ३३ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
-
सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होता.
-
त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
-
मुंबईतील नोकरी सोडून कोकणात वसलेल्या या जोडप्याने गावाकडील खाद्यसंस्कृती, सण व उत्सव जगासमोर आणले आहेत.
-
४० भाषांमधील प्रेक्षकांचे प्रेम कमावताना प्रत्येक व्हिडिओमागे किती विचार करावा लागतो याविषयी त्यांनी माहिती दिली होती.
-
शिरीष व पत्नी पूजा गवस (Pooja Gavas) यांच्या चॅनेलचे ४ लाख २७ हजार सबस्क्राइबर्स आहेत.
-
गवस जोडप्याने आतापर्यंत या चॅनेलवर १६१ व्हिडीओ तयार करून अपलोड केलेले आहेत.
-
शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते.
-
एमबीएचे शिक्षण घेतलेला शिरीष गवस मुंबईत नामांकित कंपनीत कामाला होता. तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती.
-
करोना नंतर ते गावी स्थायिक झाले आणि त्यांनी रेड सॉईल स्टोरीजसारखा अनोखा प्रयोग केला.
-
काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.
-
‘रेड सॉईल स्टोरीज’च्या व्हिडीओंवर चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.
Photos: ‘रेड सॉइल स्टोरीज’ फेम शिरीष गवसचं दुःखद निधन; त्यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
मुंबईतील नोकरी सोडून कोकणात वसलेल्या या जोडप्याने गावाकडील खाद्यसंस्कृती, सण व उत्सव जगासमोर आणले आहेत.
Web Title: Red soil stories shirish gavas death know about his family career left mumbai job wife pooja gavas sdn